ETV Bharat / city

Antilia and Mansukh Hiren Murder Case : एटीएसने केलेल्या तपासाचा 1 हजार पानाचा अहवाल चांदीवाल आयोगासमोर सुपूर्द

author img

By

Published : Feb 4, 2022, 2:02 AM IST

राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुख यांनी मागील सुनावणी रोजी परमवीर सिंग यांचे परम सत्य आयोगासमोर रेकॉर्डवर आले पाहिजे. त्याकरिता अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील एटीएसने केलेला तपास हा आयोगाने रेकॉर्डवर घ्यावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार काल (गुरुवार) एटीएसने 1000 पानांचा अहवाल आणि संबंधित कागदपत्रे आयोगाकडे सुपूर्द केली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावल्यानंतर राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुख यांनी मागील सुनावणी रोजी परमवीर सिंग यांचे परम सत्य आयोगासमोर रेकॉर्डवर आले पाहिजे. त्याकरिता अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील एटीएसने केलेला तपास हा आयोगाने रेकॉर्डवर घ्यावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार काल (गुरुवार) एटीएसने 1000 पानांचा अहवाल आणि संबंधित कागदपत्रे आयोगाकडे सुपूर्द केली आहे.


एटीएसच्या तपास अहवालातून परमबीरचे परम-सत्य बाहेर येईल, असे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आयोगासमोर सांगितले होते. या पार्श्वभूमीवर या अहवालात काय नमूद केले आहे, याबाबत उत्सुकता आहे. परमबीर सिंग हेच मास्टरमाईंड असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. गेल्या काही दिवसांपासून चांदिवाल आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. यातच अनिल देशमुख यांनी सांगितले होते की एटीएसच्या तपास अहवालातून परमबीरचे परम-सत्य बाहेर येईल. या पार्श्वभूमीवर एटीएसने अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान परमबीर सिंग यांच्याविरोधात बरेच पुरावे गोळा केले होते. देशमुख यांनी आयोगाला हे अहवाल रेकॉर्डवर घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज एटीएसने 1000 पानांचा अहवाल आणि संबंधित कागदपत्रे आयोगाकडे सुपूर्द केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीला दिलेल्या जबाबामध्ये असे म्हटले आहे, की मागील वर्षी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील अँटिलिया स्फोटकं प्रकरणाचे मास्टरमाईंड माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हेच असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीच्या आरोपपत्रात देशमुख यांच्या जबाबाचा उल्लेख करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर आपण नैतिकता म्हणून राजीनामा दिला, असे अनिल देशमुख यांनी सांगितल्याचे ईडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमबीर सिंग दिशाभूल करत होते, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.

हेही वाचा - Dnyandev Wankhede Defamation Case : नवाब मलिकांना 'या' तारखेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.