ETV Bharat / city

Chandrakant Patil : महामार्गावर वाहतूक नियम मोडल्यामुळे प्रशासनाने आकारले दंड; वेग मर्यादा वाढविण्याची चंद्रकांत पाटलांची मागणी

author img

By

Published : Apr 29, 2022, 7:49 PM IST

Updated : Apr 29, 2022, 8:02 PM IST

गाडी नियंत्रणात असायला पाहिजे याबाबत काहीही दुमत नाही. पण ही वेग मर्यादा आता वाढविण्याची गरज असल्याचेही चंद्रकांत पाटील ( BJP Leader Chandrakant Patil ) म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांना वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे दंड भरावा ( Penalties for breaking traffic rules ) लागला आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. शिवाय ज्यांनी छापले आहे त्यांच्या विरोधात दावा दाखल करावा लागेल, असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - पुणे ते कोल्हापूर या महामार्गावर वेगाने गाडी चालविल्यामुळे मला यापूर्वी साडे बारा हजारांचा दंड झाला आहे. तो आम्ही भरला सुद्धा आहे. आता पुन्हा साडे बारा हजारांचा दंड झाला असून तो सुद्धा भरला असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. शिवाय एकीकडे रस्ते चांगले करायचे गाड्या महागड्या घ्यायच्या आणि वेगाने गेल्यावर दंड लावायचा हे कुठेतरी चुकीचे आहे. गाडी नियंत्रणात असायला पाहिजे याबाबत काहीही दुमत नाही. पण ही वेग मर्यादा आता वाढविण्याची गरज असल्याचेही चंद्रकांत पाटील ( BJP Leader Chandrakant Patil ) म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांना वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे दंड भरावा ( Penalties for breaking traffic rules ) लागला आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. शिवाय ज्यांनी छापले आहे त्यांच्या विरोधात दावा दाखल करावा लागेल, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील
'अशा दंडांमुळे घर दार विकायची वेळ येणार' : चंद्रकांत पाटील हायवेवरील कॅमेरांबाबत बोलताना म्हणाले, कोल्हापूर पुणे मार्गावर अनेक कॅमेरे लावलेले आहेत. या प्रवासात अनेकवेळा गाडीचे स्पीड वाढलेले लक्षात येत नाही. मी काही वाचत असतो किंवा फोनवर बोलत असतो. आपला ड्रायव्हर सुद्धा नकळत स्पीड वाढवतो. अशा वेळी त्या कॅमेरांमध्ये कैद होते. अशा वेळी त्या दंडाचे चलन येते मी नियम पाळणारा आहे. त्यामुळे आम्ही त्याचे रीतसर दंड भरले आहेत. मात्र मला काही दिवसांपूर्वी साडे बारा हजारांचा दंड आला होता तो भरला आहे. मात्र आता पुन्हा साडे बारा हजारांचा दंड आला आहे, तो सुद्धा भरला आहे. जर असेच सुरू झाले तर एक वेळेस घर दार विकायची वेळ येईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.



'कशावरून तुमच्या कॅमेरात बरोबर कॅच झाले' ? : गाडीला वेग मर्यादा असलीच पाहिजे याबाबत माझा अजिबात विरोध नाही. मात्र अशा पद्धतीने दंड वसूल करण्यावर माझा विरोध आहे. कारण आपण अनेक कॅमेरे लावले आहेत. त्यात कशावरून हे बरोबरच कैद केले असेल ? असा सवाल सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. पण आम्ही कायदा पाळणारे आहोत त्यामुळे सर्व दंड भरला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Bhim Army Warn Raj Thackeray Aurangabad Sabha : औरंगाबादेतील राज ठाकरेंची सभा उधळून लावू; भीम आर्मीचा इशारा

Last Updated :Apr 29, 2022, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.