ETV Bharat / city

..हे तर केंद्र आणि राज्य सरकारचे कारस्थान, सरकारला बुद्धी देण्याचे राजू शेट्टींचे अंबाबाई चरणी साकडे

author img

By

Published : Oct 8, 2021, 2:56 PM IST

Updated : Oct 8, 2021, 3:12 PM IST

Raju Shetti on FRP
Raju Shetti on FRP

केंद्र सरकारने एकरकमी मिळणाऱ्या एफआरपीचे तीन तुकडे करण्याचे कारस्थान रचले आहे. यामध्ये राज्य सरकारही मागे राहिले नाही, असा घणाघात स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

कोल्हापूर - केंद्र सरकारने एकरकमी मिळणाऱ्या एफआरपीचे तीन तुकडे करण्याचे कारस्थान रचले आहे. यामध्ये राज्य सरकारही मागे राहिले नाही, असा घणाघात स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. या दोन्विही सरकारांच्या विरोधातच सुरू असलेल्या आपल्या लढाईला यश येऊ दे आणि ऊस उत्पादक शेतकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला बुद्धी दे, असे साकडे त्यांनी अंबाबाई चरणी घातले. शिवाय देशातील एकही पक्ष ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूचा राहिलेला नाही म्हणून देवाकडे जायची वेळ आल्याची प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी माध्यमांशी बोलताना
जेजुरी येथे 'जागर एफआरपी'चा ची सांगता -
एकरकमी एफआरपीचा जागर करण्यासाठी मी राज्यभरात दौरा करत आहे. याकाळात महाराष्ट्रातील जी शक्तिपीठे आणि तीर्थक्षेत्रे आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले. शेट्टी यांनी कोल्हापुरातील अंबाबाईचे दर्शन घेतले. शिवाय सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी प्रार्थना सुद्धा त्यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून एकरकमी एफआरपीचा लढा सुरू आहे. तो यशस्वी व्हावा आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा यासाठी सरकारलाही जाग यावी याबाबत सर्वच ठिकाणी प्रार्थना करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले. कोल्हापुरातून सुरू झालेल्या या जागर एफआरपीचा यात्रेची सांगता 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जेजुरी येथे या जागर यात्रेची सांगता होणार आहे, असेही राजू शेट्टी यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.


हे ही वाचा - 'अपना टाईम भी आयेगा..' आयकर विभागाच्या छापा सत्रावरुन संजय राऊतांचा भाजपला सुचक इशारा

'हे' केंद्र आणि राज्य सरकारचे कारस्थान -

गेल्या 2 वर्षांत केंद्र सरकारच्या नीती आयोग आणि कृषिमूल्य आयोगाने कटकारस्थान रचून शेतकऱ्यांना 2011 च्या कायद्यानुसार एकरकमी मिळणाऱ्या एफआरपीचे तीन तुकडे करण्याचे कारस्थान रचले आहे. यामध्ये राज्य सरकार सुद्धा मागे राहिले नाही. कारण केंद्र सरकारने राज्य सरकारकडे आपला अभिप्राय विचारला होता. त्यानुसार त्यांनी सुद्धा अभिप्राय दिला होता. त्यानुसार त्यांनी ऊस गेल्यानंतर 60 टक्के एफआरपी त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कारखाना बंद झाल्यावर 20 टक्के एफआरपी आणि दुसऱ्यावर्षी कारखाना सुरू झाल्यावर 20 टक्के एफआरपी असे तीन टप्पे राज्याने सुचवले आहे, असेही शेट्टी यांनी म्हटले.

हे ही वाचा - Cruise Drug Case : आर्यन खान आर्थर रोड कारागृहात दाखल; तर दुसरीकडे त्याच्या जामिनावर सुनावणी सुरू

Last Updated :Oct 8, 2021, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.