ETV Bharat / city

ST Workers Strike : ..अन्यथा कोल्हापुरातील हजारो कर्मचारी मुंबईला पायी धडकणार, एसटी संघटनेचा इशारा

author img

By

Published : Nov 22, 2021, 9:52 PM IST

Updated : Nov 22, 2021, 10:01 PM IST

मागील 13 दिवसांपासून मुंबईमधील आझाद मैदानात एसटी कर्मचारी कुटुंबासह आंदोलन करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा कोल्हापुरातील हजारो कर्मचारी मुंबईला पायी चालत जाऊन आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा कोल्हापूर जिल्हा एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिला आहे.

st strike
st strike

कोल्हापूर - गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचारी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. मात्र आजूनही यावर तोडगा निघालेला नाही. तसेच मागील 13 दिवसांपासून मुंबईमधील आझाद मैदानात आमचे कर्मचारी कुटुंबासह आंदोलन करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा कोल्हापुरातील हजारो कर्मचारी मुंबईला पायी चालत जाऊन आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा कोल्हापूर जिल्हा एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिला आहे.

एकीकडे कर्मचाऱ्यांचे आंदोलन तर दुसरीकडे एसटी सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न -

यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले, एकीकडे एसटी कर्मचारी आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करत आहेत. गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरातील एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. असे असताना अनेक ठिकाणी एसटी प्रशासनाकडून बस स्थानकातून वाहतूक सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. हा कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडून केवळ वेळकाढूपणा सुरू आहे. एसटी कर्मचारी 15 दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानात ठिय्या मांडून आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत कोणताही निर्णय न झाल्यास आम्ही सुद्धा कोल्हापुरातील जवळपास साडेपाच हजार एसटी कर्मचारी मुंबईला पायी जाणार आहे, असा इशारा पाटील यांनी शासनाला दिला आहे.

कोल्हापुरातील हजारो कर्मचारी मुंबईला पायी जाणार
अजून किती प्राण जाण्याची सरकार वाट बघणार आहे ?
आजपर्यंत तब्बल 40 हुन अधिक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य होत नाहीत म्हणून आत्महत्या केल्या आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण व्हावे ही एकमेव महत्वाची मागणी आहे आणि त्यासाठी कर्मचारी टोकाचे पाऊल उचलून प्राणांची आहुती देत आहेत. आज सुद्धा एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे अजून किती प्राण जाण्याची सरकार वाट बघणार आहे, असा सवाल सुद्धा कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.
Last Updated :Nov 22, 2021, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.