ETV Bharat / city

Pravin Darekar On Pawar Modi Meet : शरद पवार डॅमेज कंट्रोल करण्यात माहिर : प्रवीण दरेकर

author img

By

Published : Apr 6, 2022, 4:41 PM IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आज संसदेच्या पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट ( Sharad Pawar Meet PM Modi ) घेतली. यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवार हे डॅमेज कंट्रोल करण्यात माहिर आहेत, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली ( Pravin Darekar On Pawar Modi Meet ) आहे.

शरद पवार डॅमेज कंट्रोल करण्यात माहिर : प्रवीण दरेकर
शरद पवार डॅमेज कंट्रोल करण्यात माहिर : प्रवीण दरेकर

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत भेट ( Sharad Pawar Meet PM Modi ) झाली. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास संसदेतील पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडमोडींमुळे या भेटीवर आता वेगवेगळी मते नेत्यांकडून येत आहे. 'ते खासदार आहे तसेच एका पक्षाचे ते प्रमुख आहेत. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली म्हणजे दोघे एकत्र येणार असे समजू नये. मी या भेटीकडे जास्त गांभीर्याने घेणार नाही, असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले ( Pravin Darekar On Pawar Modi Meet ) आहे. तसेच सध्या राज्यात तपास यंत्रणेचा ससेमिरा महाविकास आघाडीच्या नेत्याच्या मागे लागला आहे. यामुळे यासंदर्भात शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले असू शकतात, असेही ते म्हणाले आहेत. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार डॅमेज कंट्रोल करण्यात माहिर : काल दिल्लीमधील शरद पवार यांच्या घरी सर्वपक्षीय आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये भाजपचे आमदारदेखील उपस्थित होते. मात्र यावर बोलताना ते म्हणाले, जर कोणत्या पक्षाने स्नेहभोजन ठेवले तर सर्वपक्षीय अधिनिवेश बाजूला ठेवून त्याला जात असतो. या स्नेहभोजनामुळे कोणतेही राजकीय गुपित दडली गेलेली नाहीत. तसेच शरद पवार डॅमेज कंट्रोल करण्यात कसे माहिर आहेत हे देशाला माहीत आहे. कोणत्याही अडचणीतून कसा मार्ग काढायचा हे शरद पवारांना चांगले माहीत आहे. कालच संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली. ते शिवसेनेचे नेते जरी असले तरी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या जास्त जवळचे असल्याने हे कुठे तरी थांबले पाहिजे, यासाठी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असावी असे ते म्हणाले आहेत.

शरद पवार डॅमेज कंट्रोल करण्यात माहिर : प्रवीण दरेकर


हेही वाचा : शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.. चर्चांना उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.