ETV Bharat / city

परमबीर सिंग भाजपचे डार्लिंग - मंत्री हसन मुश्रीफ

author img

By

Published : Apr 2, 2021, 4:57 PM IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे भाजपचे डार्लिंग आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.

Minister Hasan Mushrif
मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे भाजपचे डार्लिंग आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा - भाजप नावाचे संकट दूर करायचे असेल तर ममता बॅनर्जींच्या पत्राचा विचार करावा -संजय राऊत

परमबीर सिंग यांना एनआयएने चौकशीसाठी का बोलवले नाही?

पुढे मुश्रीफ म्हणाले, वाझे प्रकरणात परमबीर सिंग यांना माफीचा साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न भाजप करत होते. याआधी देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये सांगत होते की, परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे जवळचे मित्र आहेत. मग आता देवेंद्र फडणवीस गप्प का बसले आहेत? असा सवाल मुश्रीफ यांनी केला. एनआयए तपास यंत्रणेने आतापर्यंत एकदाही परमबीर सिंग यांना या प्रकरणांमध्ये चौकशीसाठी बोलवले नाही, असेसुद्धा मुश्रीफ यांनी सांगितले.

भाजपने माफी मागावी, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ - मुश्रीफ

भाजपचे नेते नवीन कुमार जिंदल यांनी शरद पवार यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्यावरून भाजपने माफी मागावी, अन्यथा आम्हीदेखील जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा देखील यावेळी हसन मुश्रीफ यांनी भाजपला दिला आहे. भाजपचे जिंदल का बंडल यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. भाजपने तत्काळ माफी मागावी नाहीतर आमच्याकडून पण अशी वक्तव्य येतील. मग कुणाच्या पाठीतून, डोक्यातून कळा येतात हे कळेल, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे एका महिलेला हरवण्यासाठी मागे लागले आहेत. जिंदालला शरद पवार यांच्यावर बोलायला लाज वाटत नाही का? दोन दिवसात माफी मागा अन्यथा राष्ट्रवादी जशास तसे उत्तर देईल, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला.

हेही वाचा - राज्यात टाळेबंदी लावणार नाही, निर्बंध आणखी कडक केले जातील - वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.