ETV Bharat / city

'कारखाने विक्रीबाबत विनाविलंब चौकशी लावावी; दूध-का-दूध पाणी-का-पाणी होऊदेत'

author img

By

Published : Jul 4, 2021, 12:38 PM IST

Updated : Jul 4, 2021, 12:43 PM IST

कारखाने विक्रीबाबत विनाविलंब चौकशी
कारखाने विक्रीबाबत विनाविलंब चौकशी

थकबाकीमध्ये गेलेल्या कारखान्यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विक्री केली, याबाबत घोटाळा झाल्याचे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्वच कारखान्यांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे म्हंटले होते. यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना तात्काळ चौकशी लावण्याचे आवाहन केले आहे.

कोल्हापूर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निगडीत असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ई़डीने कारवाई करण्यात आली. त्यानंतर विरोधकांकडून इतरही लिलावात निघालेल्या कारखान्याची चौकशी करण्याची मागणी करण्यातल येत आहे. या प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखाने विक्रीबाबत अमित शहा यांना पत्र लिहून विनाविलंब चौकशी लावावी, दूध का दूध पाणी का पाणी होऊ देत, असे आव्हान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.

थकबाकीमध्ये गेलेल्या कारखान्यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विक्री केली, याबाबत घोटाळा झाल्याचे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्वच कारखान्यांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे म्हंटले होते. यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ चौकशी लावण्याचे आवाहन केले आहे.

कारखाने विक्रीबाबत विनाविलंब चौकशी लावावी;- मुश्रीफ
रीतसर निविदा काढून कारखाने विकले - मुश्रीफयावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने थकबाकीमध्ये गेलेल्या कारखान्यांची विक्री केली आणि यामध्ये आता घोटाळा झाला म्हणत ईडीने चौकशी लावली आहे. मात्र अनेक कारखाने आर्थिक अडचणीत आले होते. त्यानंतर बँकेचे व्याज, मुद्दल थकल्यामुळे बँकेने शेवटी कारखाने रीतसर निविदा काढून सर्वाधिक बोली लावली त्यांना विकले. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वच कारखान्यांची चौकशी लावावी, अशी मागणी केली आहे. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी पत्र लिहणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे त्यांनी हे तात्काळ आणि विनाविलंब करावे. मात्र, हे सगळं राजकारण सुरू आहे. मुद्दाम चौकशी लावल्या जात आहेत. खरंतर याबाबत यापूर्वीच 'दूध का दूध पाणी का पाणी' झाले आहे, आताही होऊ देत, असेही मुश्रीफ यांनी म्हंटले आहे. कारखान्यांच्या संचालकांची चौकशी आवश्यक - यावेळी हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, खरंतर राज्य सहकारी बँकेने रीतसर निविदा काढून सर्वाधिक निविदा आली त्यांना कारखाने विकले. याबाबत यापूर्वी सुद्धा चौकशी झाली यामध्ये काहीही घोटाळा नसल्याचे निष्पन्न झाले आहे. खरंतर, ज्यांनी हे कारखाने तोट्यात घालवले त्या कारखान्यांच्या संचालकांची चौकशी लावली पाहिजे, असे मुश्रीफ यांनी म्हंटले. बँकेने लिलाव प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पाडली आहे. त्यामुळे त्याची चौकशी कधीही आणि कोणीही करू शकता असेही त्यांनी म्हंटले.
Last Updated :Jul 4, 2021, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.