ETV Bharat / city

Kolhapur Dussehra : संस्थानकाळातील परंपरेची साक्ष देणारा कोल्हापूरचा 'शाही दसरा सोहळा'

author img

By

Published : Oct 4, 2022, 8:59 PM IST

dussehra celebrations of kolhapur
dussehra celebrations of kolhapur

Royal Dussehra celebration: कोल्हापूरचा नवरात्रोत्सव आणि इथल्या ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याला एक वेगळं महत्व आहे. देशभरात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र म्हैसूरनंतर कोल्हापूरात साजरा होणारा दसरा सोहळा संस्थानकाळातील परंपरेची आजही साक्ष देतो. त्यामुळेच हा सोहळा पाहण्यासाठी अवघे कोल्हापूर याठिकाणी येत असतात. खरंतर कोल्हापुरातील हा सोहळा देशभरात एक प्रमुख सोहळा म्हणूनही ओळखला जातो. यावर्षी हा सोहळा दोन दिवस पार पडणार आहे. तर पुढच्या वर्षीपासून शासनाच्या सहभागाने तीन दिवस सोहळा पार पडणार आहे.

कोल्हापूर: कोल्हापूरचा नवरात्रोत्सव Navratri festival of Kolhapur आणि इथल्या ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याला एक वेगळं महत्व आहे. देशभरात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र म्हैसूरनंतर कोल्हापूरात साजरा होणारा दसरा सोहळा संस्थानकाळातील परंपरेची आजही साक्ष देतो. त्यामुळेच हा सोहळा पाहण्यासाठी अवघे कोल्हापूर याठिकाणी येत असतात. खरंतर कोल्हापुरातील हा सोहळा देशभरात एक प्रमुख सोहळा म्हणूनही ओळखला जातो. यावर्षी हा सोहळा 2 दिवस पार पडणार आहे. तर पुढच्या वर्षीपासून शासनाच्या सहभागाने 3 दिवस सोहळा पार पडणार आहे.

अनेक वर्षांची परंपरा असेलेला शाही सोहळा कोल्हापूरात साजरा होणारा शाही दसरा सोहळा Royal Dussehra celebration देशभरात ओळखला जातो. नवरात्रोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच विजयादशमी. याच दिवशी कोल्हापूरातल्या दसरा चौक मधील मैदानात भव्य दिव्य असा शाही दसरा सोहळा संपन्न होत आला आहे. याला अनेक वर्षांची परंपरा आहे. कालानुरूप यामध्ये काही बदल होत गेले मात्र आजही येथील छत्रपती घराण्याने ही परंपरा जपली असून तोच उत्साह आणि शानदार सोहळा इथले नागरिक अनुभवतात.

परंपरेची साक्ष देणारा कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा

हत्ती, घोडे, उंट यांच्यासह मोठा लवाजमा सोहळ्यात असायचा सहभागी पूर्वी कोल्हापुरातील या सोहळ्यात हत्ती, घोडे, उंट आदीसह मोठा लवाजमा घेऊन छत्रपती घराणे या सोहळ्यात सहभागी होत होते. आजही तोच उत्साह, राजेशाही थाट आणि सोहळ्याची परंपरा जपली आहे. सध्या यामध्ये काळानुसार काही बदल झाले आहेत. पूर्वी जुना राजवाडा येथून शाही लवाजमा निघायचा. आता न्यू पॅलेस येथून छत्रपती घराण्यातील सर्वच सदस्य यामध्ये श्रीमंत शाहू छत्रपती, युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे आणि यशराजे हे एका 'मेबॅक' मोटारीतून या सोहळ्याला येत असतात. त्यांचे बँड पथकाने स्वागत केले जाते. पूर्वी हाच सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जात होता.

या सोहळ्याची भव्यता आणि उंची ही तितकीच मोठी होती. भवानी मंडप येथुन शाही मिरवणुकीला सुरुवात होत होती. या मिरवणुकीत सजवलेले हत्ती, घोडे, उंट आदी भव्य लवाजमा असायचा. सोबत अनेक पारंपरिक वाद्य, यामध्ये विशेष म्हणजे तुतारी वादक सुद्धा असायचे. यामध्ये अंबाबाईची पालखी सोबत भवानी देवीसह गुरू महाराज यांची पालखी असते. याबरोबरच सर्वच मानकरी, इनामदार, जहागीर, अधिकारी आदींची यामध्ये उपस्थिती असायची. सायंकाळच्या सुमारास ही मिरवणूक निघून साडे सहा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथे फोहोचत असते.

घराण्यातील सदस्य 'मेबॅक' येतात मोटारीतून दसरा चौकात दसरा सोहळ्याला जो पूर्वीचा थाट आणि भव्यता होती. त्यामध्ये काही बदल झाले असून सोहळ्याचा उत्साह आणि परंपरा मात्र आजही या सोहळ्याची उंची वाढवतात. अवघे कोल्हापूर या ठिकाणी एकवटलेले असते. कोल्हापूर आणि इथला शाही दसरा सोहळा एक वेगळं समीकरणच आहे. याची संपूर्ण देशभरात वेगळी ओळख आहे. पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात हत्ती, घोडे, उंट आदी जरी या मिरवणुकीत सहभागी होत नसले, तरी गेल्या काही वर्षांपासून छत्रपती घराणे न्यू पॅलेस येथून एका विदेशी 'मेबॅक' मोटारीतून दसरा चौक येथील सोहळ्याच्या ठिकाणी दाखल होत असतात. त्यांच्या समोर ट्रॅफिक पोलिसांनी छत्रपती घराण्यातील सर्वच सदस्य, मानकरी आदी सर्वजण पारंपरिक पोशाखात सोहळ्यात सहभागी होत असल्याने सोहळ्याची अधिकच उंची वाढते.

सायंकाळी शमीपूजनाचा कार्यक्रम दरवर्षी, सायंकाळी साडे सहा वाजता इथला शमीपूजनाचा कार्यक्रम पार पडत असतो. तत्पूर्वी रितिरिवाजानुसार करवीर निवासिनी आई अंबाबाईची पालखी सोबत भवानी देवी आणि गुरू महाराज यांची पालखी लावजम्यासह आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात दसरा चौक येथे दाखल होते. यावेळी हवेत बंदुकीच्या गोळ्या झाडत हा लवाजमा मैदानात दाखल होतो. या सोहळ्यासाठी एक भव्य शामियाना उभारण्यात येतो. यामध्ये छत्रपती घराण्यासह निमंत्रित व्यक्तींची आसन व्यवस्था केली जाते. यावेळी साडे सहा वाजल्यानंतर छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या हस्ते शमीच्या पानांचे केले जाते. त्यानंतर काही क्षणातच सोने लुटण्यासाठी कोल्हापुरकरांची एकच झुंबड उडत असते. हा सोहळा पार पडल्यानंतर छत्रपती घराण्यातील सदस्य कोल्हापूर वासीयांना सोने देत दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर सर्व पालख्या आणि छत्रपती घराण्यातील सर्वजणच पुन्हा परत न्यू पॅलेसकडे रवाना होतात. आजही ही परंपरा जपली असून सर्वजण आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहत असतात. यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात होणार असून 2 दिवस हा सोहळा होणार आहे. शिवाय पुढच्या वर्षीपासून 3 दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा सोहळा शासनाच्या सहभागाने पार पडणार आहे.

यावर्षीपासून शासनाचा सहभाग कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात यावर्षी शासनाचाही सहभाग असणार आहे. यंदा 2 दिवस दसरा सोहळा होणार आहे, तर पुढच्या वर्षीपासून तीन दिवस हा शाही दसरा सोहळा होणार आहे. यामध्ये न्यु पॅलेस ते दसरा चौक पर्यंत विविध प्रदर्शनही भरवले जाणार असून शाहू महाराजांच्या पुतळ्यावर आणि आई अंबाबाईच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा विचार सुरू आहे. यासाठी शासनाकडून 25 लाखांचा निधी दिला जाणार, अशी नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी 2 दिवसांपूर्वी घोषणा केली आहे. स्वतः मंत्री केसरकर यांनी न्यु पॅलेसमध्ये जाऊन श्रीमंत शाहू महाराज आणि छत्रपती घराण्यातील सदस्यांची भेट घेतली आणि कशा पद्धतीने शासनाने यामध्ये आपला सहभाग दाखवावा याबाबत माहिती घेतली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.