ETV Bharat / city

Eco Friendly Ganesh Idols झाडांच्या पाला पाचोळ्यापासून गणेशमूर्ती, कोल्हापूरातील मूर्तिकाराची कमाल

author img

By

Published : Aug 22, 2022, 8:21 PM IST

Updated : Aug 23, 2022, 7:19 PM IST

Gunkali Bhosale
गुणकली भोसले

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती Eco Friendly Ganesha Idol Kolhapur बनत आल्या आहेत. यामध्ये शाडू, मातीपासून किंवा कागदी लगद्यापासून मूर्ती बनलेल्या पाहिल्या आहेत. एवढेच काय तर गाईच्या शेणापासून सुद्धा गणेशमूर्ती बनल्या आहेत. मात्र कोल्हापुरातल्या पाचगाव येथे राहणाऱ्या मूर्तीकाराने शाडू, कागदाचा लगदा ते चक्क पाला पाचोळा आणि गवतापासून गणेशमूर्ती साकारल्या असल्याचे म्हटले आहे.

कोल्हापूर - गणेशोत्सव साजरा करत असताना पर्यावरणाचा सुद्धा विचार व्हायला हवा यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या गणेशमूर्ती न वापरण्याबाबत सुद्धा सांगण्यात येते. यालाच प्रतिसाद देत गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती Eco Friendly Ganesha Idol Kolhapur बनत आल्या आहेत. यामध्ये शाडू, मातीपासून किंवा कागदी लगद्यापासून मूर्ती बनलेल्या पाहिल्या आहेत. एवढेच काय तर गाईच्या शेणापासून सुद्धा गणेशमूर्ती बनल्या आहेत. मात्र कोल्हापुरातल्या पाचगाव येथे राहणाऱ्या मूर्तीकाराने शाडू, कागदाचा लगदा ते चक्क पाला पाचोळा आणि गवतापासून गणेशमूर्ती साकारल्या असल्याचे म्हटले आहे. शिवाय गणेशमूर्तीसोबत त्या प्रत्येक ग्राहकाला एक झाडाचे रोप सुद्धा भेट देत आहेत. गुणकली भोसले असे या मूर्तीकाराचे नाव आहे.

प्रतिक्रिया देताना मूर्तीकार गुणकली भोसले



झाडांची पडलेली पानं, पाला पाचोळा अन् गावतापासून बनलेला बाप्पा : कोल्हापुरातल्या पाचगाव येथे राहणाऱ्या गुणकली भोसले यांचा परिवार गेल्या 6 ते 7 पिड्यांपासून कला क्षेत्रात काम करत आहेत. गुणकली स्वतः एक सतार वादक आहेत. मात्र रंगकामाची आवड असल्याने त्यांनी आपल्या वडिलांना गणेशमूर्ती बनविण्याबाबत कल्पना बोलून दाखवली आणि 15 ते 16 वर्षांपूर्वी त्यांनी वडिलांसोबत आपल्या घरी दरवर्षी गणेशमूर्ती बनवायला सुरुवात केली. या मूर्ती बनवत असताना त्यांनी पर्यावरणाचा नेहमीच विचार केला आहे. त्यांनी आजपर्यंत शाडूच्या आणि विविध मातीपासून गणेशमूर्ती बनविल्या आहेत. शिवाय काही वर्षांपासून यांनी कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनविल्या आहेत. घरातच सर्व कुटुंबीय मिळून त्या सर्व मूर्ती साकारतात. यामध्ये सुद्धा त्यांनी काहीतरी वेगळं करायचे असे ठरवले आणि पाला पाचोळा, झाडांची पडलेली पानं तसेच गावतापासून गणेशमूर्ती साकारू शकतो हे करून दाखवले. गेल्या 2 ते 4 वर्षांपासून त्या शाडूच्या मूर्ती सोबतच अशा मूर्ती बनवत आहेत. या मूर्ती बनविण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे सध्या कमी प्रमाणात त्यांनी या साकारल्या आहेत. मात्र भविष्यात यापेक्षाही अधिक मूर्ती बनविण्याबाबत त्यांनी ठरवले आहे.


अशा बनवतात गणेशमूर्ती : गुणकली भोसले म्हणाल्या, सुरुवातीला परिसरातील पाला पाचोळा, तसेच विविध झाडांची पडलेली पानं मोठ्या प्रमाणात आढळतात. ते गोळा केले जाते. शिवाय काही गवताचा सुद्धा यामध्ये वापर करू शकतो. त्यामुळे ते सुद्धा गोळा करून कडक उन्हामध्ये वाळवले जाते. वाळवलेल्या या पाला पाचोळ्याची बारीक पावडर तयार केली जाते. त्याच पावडरमध्ये डिंक, थोडी माती आदी गोष्टींचा वापर करून तयार केलेल्या मिश्रणापासून या सुंदर गणेशमूर्ती तयार केल्या जातात. या वजनाला अतिशय हलक्या असतात. शिवाय दिसायला सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्तीप्रमाणेच दिसतात. त्याला अधिक सुंदर बनविण्यासाठी विविध आभूषणे वापरतात. शिवाय ते विसर्जन करण्यापूर्वी काढुन पुढच्या वर्षी पुन्हा वापरू शकतात असे सांगतात. त्यामुळे अशाच मूर्ती बनवल्यास निसर्गाची होत असलेली हानी आणि प्रदूषण आपल्याकडून थांबवू शकतो, असेही मूर्तिकार गुणकली भोसले सांगतात.


मूर्तीसोबत ग्राहकांना झाड भेट : या व्यवसायातून भोसले यांनी पर्यावरण रक्षणाची सुद्धा काळजी घेतली आहे. स्वतः पर्यावरणपूरक गगणेशमूर्ती तयार करून त्यामध्ये बियांचे रोपन केले जाते. आता तर मूर्तीच पाला पाचोळ्यापासून बनविल्या आहेत. जानेवारी महिन्यापासून त्या यामध्येच वेळ देत असतात. बहुतांश मूर्तींची आता विक्री सुद्धा झाली आहे. त्या मूर्ती विक्री करत असताना त्या प्रत्येकाला एक झाड सुद्धा भेट म्हणून देत असतात. शिवाय याच गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर त्यातील माती या झाडांसाठी वापरा अशाही सांगतात. पुढच्या वर्षी मंडळांच्या गणेशमूर्ती सुद्धा बनविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Mumbai Ganesh Mandals मुंबईत सार्वजनिक गणपती मंडळांच्या बाप्पांचे थाटात आगमन

Last Updated :Aug 23, 2022, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.