ETV Bharat / city

नितेश राणे यांच्या आरोपानंतर कोल्हापूरात तीव्र पडसाद; राणेंच्या पुतळ्यांना जोडे मारून केले दहन

author img

By

Published : Mar 18, 2021, 1:47 AM IST

Kolhapur Yuva Sena protests againts Nitesh Rane after his controversial statement against Shivsena
नितेश राणे यांच्या आरोपानंतर कोल्हापूरात तीव्र पडसाद; राणेंच्या पुतळ्यांना जोडे मारून केले दहन

नितेश राणे यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. तसेच ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राणे यांनी जाहीर माफी मागावी; अन्यथा यापुढेही नितेश राणे यांच्या विरोधात मार्चा, आंदोलने करू असा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात राणे यांच्या आरोपानंतर त्याचे पडसाद उमटले आहेत. कोल्हापूरातल्या ठिकठिकाणी आंदोलन करत त्याचा निषेध करण्यात आला...

कोल्हापूर : आमदार नितेश राणे यांनी शिवसेना, ठाकरे कुटुंबाच्या बाबतीत तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्याबाबत व्यक्तव्य केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील युवासेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली. कोल्हापूरातल्या युवसेनेच्या वतीने मिरजकर तिकटी येथे निलेश राणे यांच्या पोस्टरला जोडे मारून, तर शिरोळमधल्या कुरुंदवाड शहरातील भालचंद्र थिएटर चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राणे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.

नितेश राणे यांच्या आरोपानंतर कोल्हापूरात तीव्र पडसाद; राणेंच्या पुतळ्यांना जोडे मारून केले दहन

राणे यांनी माफी मागावी..

नितेश राणे यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. तसेच ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राणे यांनी जाहीर माफी मागावी; अन्यथा यापुढेही नितेश राणे यांच्या विरोधात मार्चा, आंदोलने करू असा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात राणे यांच्या आरोपानंतर त्याचे पडसाद उमटले आहेत. कोल्हापूरातल्या ठिकठिकाणी आंदोलन करत त्याचा निषेध करण्यात आला. कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी येथे शिवसैनिकांनी राणे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केले तर शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड मधील भालचंद्र थिएटर चौकात राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कोल्हापूर युवासेना जिल्हाप्रमुख मंजीत माने, विधानसभा अधिकारी सागर पाटील, उपजिल्हा अध्यक्ष अक्षय चाबूक, शिरोळ मध्ये युवासेना तालुका अध्यक्ष प्रतिक धनवडे, उपतालुका अध्यक्ष मंगेश पाटील, वैभव गुजरे, शिवसेना कुरुंदवाड शहरप्रमुख बाबासो सावगावे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय आहे प्रकरण..

नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील सगळी काम आदित्य ठाकरे यांच्या गँगलाच का? असा सवाल केला होता. शिवाय आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मित्र परिवारातील जी काही निवडक मंडळी आहेत, त्यातील डिनो मोरिया आणि वरूण सरदेसाई आणि कदम या तिघांच्या कंपनीला सर्व टेंडर दिली जातात आणि त्यांच्याकडूनच ही कामे केली जातात. त्यामुळे या सरकारची कामे करण्याची जी पद्धत आहे ती संशयाची आहे. त्याचबरोबर सरकार या सगळ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप सुद्धा राणे यांनी केला होता. त्यात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांना प्रामुख्याने पाठीशी घालतात असे राणेंनी म्हंटले होते. नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्यावरती त्यांनी टीका आणि आरोप केले आहेत की, वरूण सरदेसाई आणि सचिन वाझे यांचे आर्थिक गैरव्यवहार होते. त्यांनी एकमेकांशी भरपूर वेळा संपर्क साधलेला होता आणि त्यांच्या सीडीआर चौकशीच्या मागणी सोबतच एनआयएकडून याची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे राणे यांनी म्हंटले होते. त्याचे आता राज्यभर पडसाद उमटले आहेत.

हेही वाचा : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.