ETV Bharat / city

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई देवी मंदिरात आता लहान मुलांनाही मिळणार प्रवेश; मंदिरातील सर्व नियम शिथिल

author img

By

Published : Mar 4, 2022, 6:57 PM IST

Updated : Mar 4, 2022, 7:06 PM IST

मंदिरात आलेले भाविक
मंदिरात आलेले भाविक

कोरोनाचा संसर्ग कमी होताच राज्य सरकारनेही नियम शिथिल केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) अंबाबाई मंदिरातील सर्व नियम शिथिल करण्यात आले आहे. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी आज पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. निर्णयामुळे आता लहान मुलांनाही आता अंबाबाईचा सहकुटुंब दर्शन घेता येणार आहे.

कोल्हापूर - कोरोना संसर्गामुळे गेली दोन ते अडीच वर्ष महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी नियम लावण्यात आले होते. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देखील काही प्रतिबंधात्मक नियम लावण्यात आले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग कमी होताच राज्य सरकारनेही नियम शिथिल केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) अंबाबाई मंदिरातील सर्व नियम शिथिल करण्यात आले आहे. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी आज पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. निर्णयामुळे आता लहान मुलांनाही आता अंबाबाईचा सहकुटुंब दर्शन घेता येणार आहे.

माहिती देताना देवस्थान समितीचे सचिव

सर्व नियम शिथिल मात्र ईपास बंधनकारक

कोरोना काळात अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी नियमावली नुसार १० वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेश बंदी होती. त्यांच्यासाठी मंदिरात प्रवेशद्वारा जवळ स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले होते. यामुळे अनेकदा भक्तानमध्ये आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद देखील झालेले पाहायला मिळाले होते. मात्र आता अंबाबाई मंदिरात भाविकांना सहकुटुंब दर्शन घेता येणार आहे. सरकारची नव्या नियमावलीनुसार मंदिरात आता लहान मुलांना ही देण्यात येणार आहे. सरकारकडून सर्व नियम हटवण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर मंदिरात प्रवेशाची क्षमताही वाढवण्यात आली आहे. आता दिवसाला ६० हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी ईपास बंधनकारक असल्याचे नाईकवाडे यांनी सांगितले आहे. भाविकांना दर्शन सुलभरित्या व्हावे यासाठी आता गाभारा आणि मुख दर्शन अशा दोन नव्या दर्शन रांगा सुरू करण्यात येणार आहेत. शिवाय महाद्वार दरवाजाही उघडण्यात येणार असून येथून मुख दर्शनाची सोय करण्यात येणार आहे.

तब्बल अडीच वर्षांनंतर बालकांचे मंदिरात प्रवेश

कोरोना नियमावलीमुळे लहान मुलांना मंदिरात प्रवेश देण्यात येत नव्हता. तसेच नारळ यासारखे वस्तू देखील नेण्यास बंदी होती. मात्र आजपासून अंबाबाई मंदिरात सर्व नियम शिथिल झाल्याने तब्बल अडीच वर्षानंतर लहान मुलांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. तसेच भक्तांना आणलेली साडी ओटीचे सामान नारळ या वस्तूंनाही अंबाबाई मंदिरात प्रवेश देण्यात आलेला आहे. यामुळे भक्तांकडून आता समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा - अमरावती जिल्ह्यात महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना; गावात तणावाचे वातावरण

Last Updated :Mar 4, 2022, 7:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.