मुंबईतील दोन अल्पवयीन तरुणींवर अत्याचार, नोकरीचे अमिष देऊन बोलावले होते जालन्याला

author img

By

Published : Oct 5, 2021, 9:00 AM IST

Updated : Oct 5, 2021, 9:34 AM IST

दोन अल्पवयीन तरुणींव अत्याचार, नोकरीचे अमिष देऊन बोलावले होते जालन्याला
दोन अल्पवयीन तरुणींव अत्याचार, नोकरीचे अमिष देऊन बोलावले होते जालन्याला ()

औरंगाबाद - मुंबईतील दोन अल्पवयीन तरुणींवर जालन्यातील मित्राने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून जालन्यात बोलावल आणि त्यानंतर त्यांच्याशी हा प्रकार झाला आहे. दरम्यान, या दोन मुलींवर चार जणांनी गेली महिनाभर सातत्याने अत्याचार केल्याची माहिती समोर आहे. या मुलींनी औरंगाबादमध्ये सिडको पोलीस ठाण्यात या घडलेल्या प्रकाराबद्दल दिली तक्रार दिली आहे. सिडको पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून, जालना पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

कदीम जालना पोलीसांची कारवाई

निधोना, जालना येथील अविनाश काकासाहेब जोगदंड (१८) या नवी मुंबईतील दिघा येथील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींना नोकरीचे आमिष दाखवून मागील (3 सप्टेंबर 2021)रोजी जालन्यात बोलावले होते. या मुलींना शहरात किरायाने एक खोली करून देऊन त्या ठिकाणी राहण्यास सांगितले. त्यानंतर, या दोन मुलींंवर अविनाश जोगदंड, त्याचा भाऊ शुभम जोगदंड, दीपक राणा आणि गणेश काकडे अशा चौघांनी सतत एक महिनाभर बलात्कार केला. या प्रकारानंतर या मुलींनी (1 ऑक्टोबर)रोजी या चौघांच्या तावडीतून आपली सुटका करून औरंगाबादमध्ये आल्या आणि सरळ पोलीस ठाणे गाठू त्यांच्या विरोधात तक्रार दिली.

तीन आरोपींना बेड्या ठोकल्या

औरंगाबादच्या सिडको पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून काल रात्री हा गुन्हा कदीम जालना पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांच्यासह कदीम जालना पोलीस, पिंक पथक यांनी रात्रभर कोंबिंग ऑपरेशन करून या अत्याचार प्रकरणातील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी अविनाश जोगदंड हा पहाटे २ वाजता नांदेडहून जालन्याकडे रेल्वेने येत असल्याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकावर सापळा रचून त्याला जेरबंद करण्यात आले. यातील दोन आरोपी गणेश काकडे आणि शुभम जोगदंड यांना शहरातील वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यामधील फरार आरोपी चंद्रकांत गंगाधर जाधव, 2)सोनू संतोष जाधव 3) संजय नारायण जाधव 4) सुशील गायकवाड (सर्व रा. नुतन वसाहत जुना जालना) यांनाही अटक केली.

हेही वाचा - संवेदनशील पंतप्रधानांनी लखीमपूरच्या शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करू नये, याचे आश्चर्य वाटते - सामना

Last Updated :Oct 5, 2021, 9:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.