ETV Bharat / city

Minor Girl Gang Rape अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

author img

By

Published : Aug 15, 2022, 6:33 PM IST

Updated : Aug 15, 2022, 7:45 PM IST

minor girl gang rape in aurangabad
औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील Kannad Taluka खेडा आठेगाव Kheda Aathegaon येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची minor girl gang rape घटना घडली. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ही मुलगी आईसोबत काम करून पोट भरत होती. या प्रकरणात एका विधीसंघर्ष बालकासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद न्यायायलायाने Aurangabad court order on minor girl gang rape त्यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी police custody to gang rapist सुनावली.

औरंगाबाद देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना कन्नड तालुक्यातील Kannad Taluka खेडा आठेगाव Kheda Aathegaon येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची minor girl gang rape घटना घडली. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ही मुलगी आईसोबत काम करून पोट भरत होती. या प्रकरणात एका विधीसंघर्ष बालकासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद न्यायायलायाने Aurangabad court order on minor girl gang rape त्यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी police custody to gang rapist सुनावली.


पीडितेला जीवे मारण्याची धमकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेडा आठेगाव येथील एक अल्पवयीन मुलगी नववीचे शिक्षण सोडून आपल्या आईबरोबर मोलमजुरी करत होती. गावातील तरुण किरण साहेबराव गोंडे, अरुण कैलास दरेकर, श्रीकांत अशोक जाधव, सौरभ जगन जाधव, गोविंद नेमीचान शेळके यांच्यासह आणखी एक अल्पवयीन मुलगा हे सह जण पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत होते. शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पीडितेच्या राहत्या घरी किरण साहेबराव गोंडे व अरुण कैलास दरेकर या दोघांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.

अत्याचार अनावर पीडितेची पोलिसांकडे तक्रार त्याआधी देखील किरण साहेबराव गोंडे वय ३२ वर्षे अरुण कैलास दरेकर वय ३१ वर्षे श्रीकांत अशोक जाधव वय ३३ वर्षे सौरभ जगन जाधव वय १९ वर्षे गोविंद नेमीचंद शेळके वय २९ वर्षे व अन्य एक अल्पवयीन मुलगा हे सतत तिची छेड काढून तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होते. शनिवारी हा प्रकार पुन्हा घडल्याने पीडितेने तिच्या आईला संपूर्ण घटना सांगितली. यानंतर पीडितेच्या आईने तातडीने कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन वरील आरोपीविरुद्ध तक्रार दिली.


पोक्सो तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव सहायक पोलिस निरीक्षक टीआर भालेराव फौजदार एस एस राजपूत उपनिरीक्षक राम बारहाते ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच पिंक मोबाईल पथक आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलिसांनी तातडीने सर्व आरोपींवर भादंविच्या कलम ३७६ ३५४ तसेच पोक्सो तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना तातडीने न्यायालयासमोर उभे करण्यात आले. औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने सहापैकी पाच आरोपींना १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव करीत आहेत.

हेही वाचा नागालँडमध्ये बंडखोर गटाच्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे 2 जवान जखमी Assam Rifles jawans injured

Last Updated :Aug 15, 2022, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.