ETV Bharat / city

Ambadas Danve On Raj Thackeray : 'मनसे भूमिका सदैव बदलत राहते, त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही'

author img

By

Published : Apr 30, 2022, 3:47 PM IST

Ambadas Danve On Raj Thackeray
आमदार अंबादास दानवे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या ( Raj Thackeray Aurangabad Shabha ) आधीच मनसे आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक संघर्ष पेटला आहे. मनसेच्या भूमिकांना आम्ही बघत नाही, त्यांच्या भूमिका सदैव बदलत राहतात, त्यामुळे त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही असे वक्तव्य शिवसेना प्रवक्ते आमदार अंबादास दानवे यांनी केले ( Ambadas Danve Attack On MNS leader Raj Thackeray ) आहे.

औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या ( Raj Thackeray Aurangabad Shabha ) आधीच मनसे आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक संघर्ष पेटला आहे. मनसेच्या भूमिकांना आम्ही बघत नाही, त्यांच्या भूमिका सदैव बदलत राहतात, त्यामुळे त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही असे वक्तव्य शिवसेना प्रवक्ते आमदार अंबादास दानवे यांनी केले ( Ambadas Danve Attack On MNS leader Raj Thackeray ) आहे.

मनसेच्या सभेने फरक पडत नाही - मनसे सभा घेत असलं तरी त्या सभांमुळे काही फरक पडत नाही. सभा झाल्यावर दोन दिवसांमध्ये सर्व विसरातील. त्यांच्याकडे संघटन नाही. त्यांची काही ताकद नाही. नगरसेवक, आमदार, खासदार काहीच नसल्याने राज्यात त्यांना प्रतिसाद मिळणार नाही. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे आमदार दानवे यांनी सांगितले.

8 जुन रोजी उद्धव ठाकरे यांची सभा - औरंगाबादेत मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मनसेच्या सभेला म्हणून उत्तर सभा नसून पक्षाची सभा आहे. शिवसेनेचा औरंगाबाद शाखेचा वर्धापन दिन असल्याने ही सभा घेण्यात येणार आहे. त्यामुळे मनसेच्या सभेशी त्याची तुलना करू नका, त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. असे मत आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.


कोणी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये - शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत कोणीही शंका व्यक्त करू नये. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आमदारांचे निलंबन झाले होते. हिंदूंसाठी हज विमान उडू देणार नाही, ही भूमिका असो की बाबरी मस्जित पडल्यावर त्याची जबाबदारी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. ज्यांनी हिंदुत्व जगायला शिकवले ते एकच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत दुसरे कोणीही नाही असे परखड मत आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे.


हेही वाचा - Sharad Pawar Replied To Raj Thackeray : '...म्हणून शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो', शरद पवारांचे प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.