ETV Bharat / city

ओबीसी अध्यादेश आधी काढला असता तर फायदा झाला असता - पंकजा मुंडे

author img

By

Published : Oct 12, 2021, 9:47 PM IST

ओबीसी आरक्षणाबाबत इम्पिरिकल डेटा हा शब्द ऐकून कान किटले आहेत. इम्पिरिकल डेटा केंद्राने नाही दिला तर, राज्य शासन का अडकून पडत आहे. राज्य सरकरने त्यांची भूमिका घ्यावी, असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यात व्यक्त केले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे ओबीसी मेळावा
obc ordinance pankaja munde

औरंगाबाद - ओबीसी आरक्षणाबाबत इम्पिरिकल डेटा हा शब्द ऐकून कान किटले आहेत. इम्पिरिकल डेटा केंद्राने नाही दिला तर, राज्य शासन का अडकून पडत आहे. राज्य सरकरने त्यांची भूमिका घ्यावी, असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यात व्यक्त केले.

प्रतिक्रया देताना भाजप नेत्या पंकजा मुंडे

हेही वाचा - तिरुपती बालाजी संस्थानचे बनावट पास तयार करणाऱ्याला सायबर पोलिसांनी केले जेरबंद

अध्यादेश आधी काढला असता तर, फायदा झाला असता

जो ओबीसी अध्यादेश काढला तो आरक्षणाला सुरक्षा देण्यास पात्र असावा. कुणी कोर्टात गेले तर, सरकारेने आपली भूमिका योग्य मांडावी. आता वेळ आहे तर याबाबत पूर्ण तयारी करून घ्यावी. हाच अध्यादेश आधी काढला असता तर, जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये फायदा झाला असता, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

आता लहान मुलांनासुद्धा जाती कळतात

आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा मित्रांना मित्रांची जात माहिती नव्हती. मात्र, आता लहान मुलांनासुद्धा जाती कळतात. प्रीतमच्या मुलांना जाती कळतात. कदाचित राज्यातील आंदोनलामुळे कळले असावे. मात्र, हे चित्र पुढील काही वर्षांमध्ये बदलायला हवे, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

ते वक्तव्य ओबीसी समाजाबाबत

ओबीसी मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी, मी आधीच उपाशी त्यात उपवास, असे वक्तव्य भाषणात केले होते. मात्र, हे वक्तव्य मी ओबीसी समाजबाबत बोलले, आपल्या बाबत नाही, असे उत्तर त्यांनी हसून दिले. दसरा मेळाव्याची लोक तयारी करत आहेत, लोकांना आतुरता आहे म्हणून मलाही आतुरता आहे. अतिवृष्टीबाबत मदत करायला हवी. दिवाळी गोड करायला हवी, असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस म्हणतात की, लोक त्यांना अजूनही मुख्यमंत्री समजतात. याबाबत बोलताना ही तर चांगली गोष्ट आहे. लोकांचे प्रेम कोणाला मिळत असेल तर चांगली बाब आहे. बाकी जनतेच्या मनातील शब्द कुणी खेचू शकत नाही, अशी टोलेबाजी देखील पंकजा यांनी केली.

हेही वाचा - औरंगाबाद : अभ्यासात प्रगती नाही म्हणून दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.