ETV Bharat / city

Pakhe Family Bull Aurangabad बैलांच्या देखभालीसाठी महिन्याला लाखोंचा खर्च; खुराक ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

author img

By

Published : Aug 26, 2022, 8:02 PM IST

Updated : Aug 27, 2022, 8:09 AM IST

औरंगाबाद येथील पखे कुटुंबीय बैलप्रेमी Pakhe Family Bull Aurangabad आहेत. सर्वत्र बैलांमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे. कारण त्यांच्याकडे असलेल्या बैलांनी राज्यासह परराज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या शंकरपटांमध्ये सहभाग घेतला आहे. इतकच नाही तर यांनी आजपर्यंत अनेक पारितोषिक देखील पटकावली Bull Fed One Lakh Per Month आहेत. Pakhe Family spends one lakh rupees on bullock feed

Pakhe Family Bull
बदाम अंजीर खाणारे बैल

औरंगाबाद - सर्वत्र आपली ओळख असावी असं प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी अनेक जण विशेष काहीसं करू पाहत असतात. पिसादेवी येथील शेतकरी असलेले पखे कुटुंबियांची राज्यासह परराज्यात ओळख Pakhe Family Bull Aurangabad झाली आणि ती मिळवून दिली त्यांच्याकडे असलेल्या बैलांनी Bull Fed Cashews Almonds. त्यांच्याकडे असलेल्या तीन बैलांसाठी महिन्याकाठी एक लाखांचा खर्च Bull Fed One Lakh Per Month ते करतात. Pakhe Family spends one lakh rupees on bullock feed

औरंगाबाद येथील बैलप्रेमी पखे कुटुंबीय

पखे कुटुंबियांचे बैलांवर विशेष प्रेम - औरंगाबाद येथील पखे कुटुंबीय बैलप्रेमी Pakhe Family Bull Aurangabad आहेत. सर्वत्र बैलांमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे. कारण त्यांच्याकडे असलेल्या बैलांनी राज्यासह परराज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या शंकरपटांमध्ये सहभाग घेतला आहे. इतकच नाही तर यांनी आजपर्यंत अनेक पारितोषिक देखील पटकावली Bull Fed One Lakh Per Month आहेत. त्यामुळे पखे कुटुंबीयांचा जीव या बैलांमध्ये असून त्यांच्यासाठी स्वतः उपाशी राहण्याची वेळ आली तरी चालेल पण बैलांना रोजचा खुराक देऊ, अशी भूमिका पखे कुटुंबीयांची असते. त्यामुळे त्यांचं प्राण्यांवर असलेले प्रेम पंचक्रोशीत चर्चेत असते.

रोज दिला जातो हजार रुपयांचा खुराक - शहराच्या जवळच असलेल्या पिसादेवी येथील संजय पखे आणि दादाराव पखे या बांधवांकडे रणवीर, हिरा आणि पिंट्या नावाचे शर्यतीची बैल आहेत. गेल्या वीस वर्षांपासून बैलांचा सांभाळ ते करत आहेत. त्यासाठी मोठा खुराक द्यावा लागतो. एका पैलवानाला लागतो त्याप्रमाणे खाद्य द्यावे लागते. एका बैलाला रोज सकाळी चार आणि रात्री चार लिटर दूध असे आठ लिटर दूध दिले जाते. या दुधामध्ये अंडी मिश्रण करून दिली जातात. त्याचबरोबर गव्हाच्या पिठामध्ये बदाम आणि अंजीर चांगल्या तुपात मिश्रण करून दिले जातात, तर शुद्ध खावा ही बैलांना दिला जातो. दिवसातून दोन वेळेस हा आहार बैलांसाठी तयार करून दिला जातो. तर दिवसभर हिरवा चारा बैल खात असतात. एका बैलाला दिवसाकाठी एक हजार रुपयांचा खर्च येतो, असे पखे कुटुंबीय बैलांवर रोज तीन हजार रुपयांचा खर्च करतात. तर महिन्याकाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च या बैलांवर करतात. या बैलांचा शेतामधी उपयोग नसला तरी हौस असल्याने या बैलांचा संभाळ करत असल्याची माहिती बैलांचे मालक संजय पखे यांनी दिली.

बैलांनी बजावली स्पर्धेत चांगली कामगिरी - पिसादेवी येथील पखे कुटुंबांकडे असलेल्या बैलांमध्ये रणवीर हा साधारणतः वीस वर्षाचा, पिंट्या पाच वर्षाचा तर हिरा हा चार वर्षाचा आहे. पखे यांच्याकडे आधी रणवीर आणि पिंट्या हे दोनच बैल होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी पाच लाख रुपयांना हिरा हा बैल विकत घेतला. हिराने आधी अनेक स्पर्धांमध्ये कामगिरी बजावली आहे. तर रणवीर आणि पिंट्या यांनी राज्यात बैलांच्या शर्यतीला आणि बाहेर राज्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. रणवीरने आजपर्यंत मध्य प्रदेश, महाराष्ट्रात 25 हून अधिक स्पर्धांमध्ये बक्षीस पटकावलं आहे. तर लहान असलेल्या हिराने राज्यात 50 स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. या बैलांमुळे पंचक्रोशीत नाव झालेच आहे. त्याचबरोबर परराज्यातही इज्जत मिळाली असून हौस असल्याने खर्च परवडत नसला तरी बैलांना सांभाळत असल्याचं संजय आणि दादाराव पखे यांनी सांगितलं.

हेही वाचा Tanha Polla Festival in Nagpur नागपुरात तान्हा पोळ्याच्या उत्सवाची तयारी, अडीच लाख रुपयांचा लाकडी नंदी विक्रीसाठी उपलब्ध

Last Updated :Aug 27, 2022, 8:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.