कर्मचाऱ्यांनी वाहतूक करणाऱ्या बसला आग, सुदैवाने जीवित हानी नाही

author img

By

Published : Sep 20, 2021, 5:12 PM IST

v

कंपनीतील काम आटोपून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास खासगी बसने घरी कर्मचारी घरी परतत होते. त्यावेळी बसने अचानक पेट घेतली. या घटनेत बस जळून खाक झाली असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

औरंगाबाद - खासगी कंपनीच्या वाहनाने अचानक पेट घेल्याची घटना सिडको भागात घडली आहे. या बसमध्ये चार कामगार प्रवास करत असताना ही घटना घडली, सुदैवाने कोणतिही जीवित हानी झाली नाही. मात्र, बस जाळून खाक झाली आहे.

कर्मचाऱ्यांनी वाहतूक करणाऱ्या बसला आग

दुसऱ्या शिफ्टचे काम आटोपून परकीन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घरी घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनाने मध्यरात्री दीडच्या सुमारास एन-2 मधील कामचौक परिसरातील जयभवानी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक पेट घेतला. या वाहनात चार कर्मचारी होते. कर्मचारी तातडीने खाली उतरल्याने जीवित हानी टळली.

चालक ख्वाजामियाँ कुरेशी यांनी माहिती देताच वाहनमालक गुरविंदर शेट्टी घटनास्थळी दाखल झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुमारे अर्धा ते पाऊणतास ही आग कायम राहिल्याने बस जळून खाक झाली आहे. या प्रकरणी पोलिसात नोंद झाली आहे. काही नागरीकांच्या सहकार्याने अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला.

चिकलठाणा दलाचे अग्निशमक प्रमुख अशोक खांडेकर हे हरिश्चंद्र पवार, मदन ताठे, अस्लम शेख, प्रवीण पचलुरे, विनोद तुपे या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. सुमारे अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अशोक खांडेकर यांनी दिली.

हेही वाचा - दरोडेखोरांनी पळविलेल्या वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.