Dussehra Melava 2022 : दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याची तयारी; कार्यकर्ते संभ्रमात

author img

By

Published : Sep 29, 2022, 1:30 PM IST

Abdul Sattar

दरवर्षीप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे देखील दसरा मेळावा घेणार आहेत. त्यामुळे यावर्षी नेमकी कुठे हजेरी लावायची असा संभ्रम अनेक शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : यावर्षीचा दसरा सर्वांसाठीच वेगळा मानला जातो आहे. विशेषतः राजकीय मंडळींसाठी तर आपलं शक्तिप्रदर्शन करण्यासाठीचा हा सण असल्याचा दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे देखील दसरा मेळावा घेणार आहेत. त्यामुळे यावर्षी नेमकी कुठे हजेरी लावायची असा संभ्रम अनेक शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे.

अब्दुल सत्तार


एकनाथ शिंदे गटाकडून तयारी : उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदा स्वतंत्रपणे शिवसेना गटाला घेऊन दसरा मेळावा घेणार आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी शिंदे समर्थक आमदारांनी कंबर कसली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातून 25 ते 30 हजार लोकांना घेऊन जायचं असं नियोजन करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीत मेळाव्याला जायचं असा मानस अनेकांनी केला आहे. शहरातून आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक मेळाव्याला जातील असा दावा राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गटाचे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.


कार्यकर्ते संभ्रमात : आपल्या गटाला नागरिकांचा समर्थन आहे हे दाखवण्यासाठी आता उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांपासून तर सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना संपर्क केला जात आहे. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक मुंबईला घेऊन जायचे याबाबत नियोजन केले जात आहे. मात्र यात अनेक कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत सापडल्याचे पाहायला मिळतं उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे दोघेही शिवसेना पक्षाचाच भाग आहे. आता नेमकं जायचं कोणासोबत असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेकांनी यंदा मेळाव्याला जायचं का नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.


शिवसेनेने केला शिंदे गटावर आरोप : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेला आहे. त्यांचे विचार या मेळाव्यातून दरवर्षी अनेकांना प्रेरित करतात. यंदा देखील उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जिल्ह्यातून जातील. त्यासाठी कुठलीही व्यवस्था पक्षाकडून केली जाणार नसून ते स्वयंपूर्ण स्वतःच्या खर्चाने भाजी भाकरी घेऊन जातील आमचं गट खोके असलेला गट नाही, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.