Dalit Adhikar Andolan : औरंगाबादमध्ये पार पडले दलित अधिकार आंदोलनाचे जिल्हा अधिवेशन

author img

By

Published : Dec 12, 2021, 10:41 PM IST

Dalit Adhikar Andolan
Dalit Adhikar Andolan ()

ऑल इंडिया दलित राइट्स मूव्हमेंटच्यावतीने (All India Dalit Right Movement) औरंगाबाद येथे येत्या 18-19 डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील दलित अधिकार अधिवेशनाच्या (Dalit Adhikar Andolan) पार्श्वभूमीवर सध्या राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यांची अधिवेशने सुरू आहेत.

औरंगाबाद - ऑल इंडिया दलित राइट्स मूव्हमेंटच्यावतीने (All India Dalit Right Movement) औरंगाबाद येथे येत्या 18-19 डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील दलित अधिकार अधिवेशनाच्या (Dalit Adhikar Andolan) पार्श्वभूमीवर सध्या राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यांची अधिवेशने सुरू आहेत. याचा भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्याचे अधिवेशन रविवारी कॉ. कॉ.व्ही. डी. देशपांडे स्मारक सभागृहात झाले. दिवंगत कॉ. कलावती साठे यांचे नाव सभा मंचाला देण्यात आले होते. जिल्हा अधिवेशनाचे दलित पॅंथरचे नेते रमेशभाई खंडागळे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उदघाटन झाले. जिल्हा अधिवेशनास पाच तालुक्यातील सुमारे 250 कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया

'एकत्र राहिल्यास अन्याय थांबवणे शक्य' -

भारत देशात केवळ श्रीमंत-गरीब असा भेद नाही, केवळ वर्गीय भेद नाहीत, तर चार वर्ण व हजारो जातीत विभागलेल्या भारतीय समाजात जातीभेददेखील हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. दलित समूहावरील अत्याचार हजारो वर्षांपासून होत आहेत. परंतु गेल्या 7 वर्षापासून मोदी सरकारच्या काळात हे अत्याचार वाढलेले आहेत. या वाढत्या अत्याचारांविरोधात, दलित श्रमिक वर्गावरील हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी आंबेडकरवादी, कम्युनिस्ट व सर्व परिवर्तनवादी शक्तींनी एकजूटीने संघर्ष करण्याचे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरवादी, दलित पॅंथरचे नेते रमेशभाई खंडागळे यांनी केले.

नविन कार्यकारणी झाली जाहीर -

दलित अधिकार आंदोलनाची 51 जणांची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. तसेच कॉ. भास्कर लहाने यांची जिल्हाध्यक्षपदी, कॉ. गणेश कसबे यांची कार्याध्यक्षपदी व कॉ. मधुकर खिल्लारे यांची जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली. अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे औरंगाबाद जिल्हा अधिवेशनाचे उदघाटन झाले. अध्यक्षस्थानी भाकप जिल्हा सचिव कॉ. अशफाक सलामी होते. प्रास्ताविक भाकप राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. प्रा.राम बाहेती यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून आझाद पक्षाचे प्रदेश सचिव प्राचार्य सुनिल वाकेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन कॉ. मधुकर खिल्लारे यांनी केले तर कॉ. भास्कर लहाने यांनी आभार मानले.

यांची होती उपस्थिती -

औरंगाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशनाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले. अॅड. अभय टाकसाळ, तारा बनसोडे, प्रकाश बनसोडे, गणेश कसबे, सय्यद अनिस, मोमीन बेग, वसुधा कल्याणकर, डाॅ. मानसी बाहेती, माया भिवसाने, महेंद्र मिसाळ, विकास गायकवाड, सुधाकर खिल्लारे, जॅक्सन फर्नांडिस, अशोक जाधव, राजू बत्तीशे, अमोल सरवदे, माधुरी जमदाडे, ज्योतीका गायकवाड, बाबुराव पठाडे, कीरणराज पंडीत, गजानन खंदारे, शेख बाबू, बाळू शेंडे, रतन आंबिलवादे, विठ्ठल त्रिभुवन आदी यावेळी उपस्थित होते. 14 डिसेंबर रोजी चित्रकलेच्या माध्यमातून काही कलाकार पैठण गेट येथे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चित्रकला कृतीतून अभिव्यक्ती सादर करणार आहेत.

हेही वाचा - CM Mamta Banerjee In Goa : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोव्यात दाखल; उद्या उमेदवार घोषित करण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.