ETV Bharat / city

मोक्षदा पाटील यांनी पायी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा; नागरिकांना पटवून दिले मास्कचे महत्त्व

author img

By

Published : Mar 20, 2021, 5:10 AM IST

Aurangabad rural SP Mokshada Patil visited Gangapur and took action on those not following corona rules
मोक्षदा पाटील यांनी पायी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा; नागरिकांना पटवून दिले मास्कचे महत्त्व

गंगापूर शहरात सार्वजनिक ठिकाणावर विनामास्क फिरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या 161 नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करत, 16,100 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले..

औरंगाबाद : गंगापूर शहरात ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी अचानक भेट देऊन रस्त्यावर उतरून रस्त्यावर विनामस्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच, यावेळी त्यांनी नागरिकांना मास्क घालण्याचे महत्वही समजावून सांगितले. त्यांनी शहरातली मुख्य बाजारपेठ असलेल्या लासुरनाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर उतरून, बाजारपेठेतील दुकानात कोविडच्या खबरदारीचा आढावा घेतला. तसेच, गर्दीच्या ठिकाणी मास्कचे वाटप करत, नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

गंगापूर शहरात सार्वजनिक ठिकाणावर विनामास्क फिरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या 161 नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करत, 16,100 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले.

मोक्षदा पाटील यांनी पायी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा; नागरिकांना पटवून दिले मास्कचे महत्त्व

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिनांक 11/03/201 पासुन कोविड-19 संसर्गाचे वाढते प्रादूभार्वाच्या अनुषंगाने अशंतः टाळेबंदीचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाच्या फैलावास प्रतिबंध होण्याच्या दृष्टीकोनातून मोक्षदा पाटील यांनी आज स्वतः गंगापुर शहरात अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी शहरातील बाजारपेठ, लासुर नाका, शिवाजी चौक याठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना मास्क वापरण्याचे महत्त्व समजावून सांगितले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही..

कोविड-19 संसर्गाचे अनुषंगाने निर्देशीत करण्यात आलेल्या शासन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था, मंगलकार्यालय चालक, दुकानदार यांची गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुध्द तात्काळ साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड विधान 1860 मधील तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मोक्षदा पाटील यांनी दिले.

जिल्हाभरात कारवाई..

औरंगाबाद जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून, कोविड-19च्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध 188 भादंवि प्रमाणे 22 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 11 हॉटेल चालक व 2 व्यायामशाळा चालकासह, एका मंगलकार्यालय चालकाचा समावेश आहे.

हेही वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात मागील सहा दिवसात 310 नवे कोरोना रुग्ण; तर 5 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.