भाजपचे आयकॉन सावरकर, काँग्रेसचे आयकॉन महात्मा गांधी - राहुल गांधी

author img

By

Published : Nov 12, 2021, 10:57 PM IST

भाजपचे आयकॉन सावरकर

भारतात सध्या दोन विचारधारा आहे देशात एक काँग्रेसची आणि दुसरी आरएसएसची आहे. भाजपा आणि आरएसएसच्या विचारधारेने देशात द्वेष पसरवण्याचे काम करत असल्याचाही आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

वर्धा - भाजपात कार्यकर्त्यांची घुसमट सुरू आहे, त्यांचे जगण कठीण झाले आहे. भाजपचे आयकॉन सावरकर तर काँग्रेसचे आयकॉन महात्मा गांधीजी आहेत. हीच गांधीजीनी दिलेली काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याची गरज आज निर्माण झाली असल्याचे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी म्हणाले. त्यांनी यावेळी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

मार्गदर्शन करताना राहुल गांधी

वर्ध्यात महात्मा गांधीजींच्या कर्मभूमी असलेल्या सेवाग्राम आश्रम परिसरातील यात्री निवास येथे काँग्रेसच चार दिवसीय राष्ट्रीय संघटन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन आभासी पद्धतीने राहुल गांधी यांच्या हस्ते पार पडले. शिबिरात काँग्रेसच्या देशभरातील 200 पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थित पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला.

काँग्रेस कार्यकर्ते
काँग्रेस कार्यकर्ते

भारतात दोन विचारधारा

भारतात सध्या दोन विचारधारा आहे देशात एक काँग्रेसची आणि दुसरी आरएसएसची आहे. भाजपा आणि आरएसएसच्या विचारधारेने देशात द्वेष पसरवण्याचे काम करत असल्याचाही आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. देशात काँग्रेसच्या विचारधारेवर आता भाजपाची विचारधारा ओव्हरशाडो झाली आहे. भाजप पक्षाकडून जास्त प्रपोगंडा जास्त आहे. पण यामध्ये आता खऱ्या अर्थाने विचारधारेची लढाई आवश्यक झाली आहे. काँग्रेसची विचारधारा सर्वात ही जुनी विचारधारा आहे. पण भाजपा मात्र हिंदुत्वाची गोष्ट करत आहे. आम्ही म्हणतो की हिंदुत्व आणि हिंदू मध्ये फरक आहे.

भाजपचे आयकॉन सावरकर

भाजपचे आयकॉन सावरकर आहे, तर काँग्रेसचे आयकॉन महात्मा गांधी आहे. काँग्रेसच्या विचारधारेला पहिले काँग्रेस कार्यकर्ता समजून घेणे गरजेची आहे. त्यानंतर ती नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहे. आता काँग्रेसचे विचार तळागळापर्यंत पोहवायची पुन्हा गरज निर्माण झाली आहे. काँग्रेसची विचारधारा संपूर्ण देशात पोहचवून सामान्य जनते पर्यंत पोहचवण्याचे काम करायचे आहे.

प्रशिक्षण बंधनकारक

काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता असो की नेता असो त्यांना प्रशिक्षण बंधनकारक होणे गरजेचे आहे. कलम ३७०, आतंकवाद, राष्ट्रीयतावर जेव्हा चर्चा होते तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. ते उत्तर देण्यासाठीच कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन तळागाळातील लोकांपर्यंत काँग्रेसचे विचार पोहचविण्याची गरज असल्याचेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

काँग्रेसचे लोक भाजपामध्ये

आजकाल काँग्रेसचे लोक भाजपामध्ये आणि आरएसएसमध्ये जातात. अनेक जण परतही येतात. उत्तराखंडचे काँग्रेसचे नेते यशपाल आर्य भाजपात गेले पाच वर्ष राहून परत आले. जेव्हा यशपाल आर्यजी परत आले त्यांना विचारले परत का आले, ते म्हणतात भाजपात राहता येत नाही. तेथे घुसमट होते ते समाजाला बदलवत नाही. ते आमचा उपयोग करून घेतात. "काँग्रेस कार्यकर्ता डर के भाजपा आरएसएस मे भाग सकता है मगर वहा जी नही सकता." तेथे जगताना मरतो. काँग्रेसला आपली विचारधारा जेव्हा लोकांपर्यंत पोहचवायची आहे, त्याकरिता आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात भीती आहे ती दुर करण्याची गरज आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचे चेहऱ्यावर सदैव हास्य पाहायला मिळते पण भाजपच्या कार्यकर्तेचे नेहमी रागात असतात. पण शिबिरात जातीपातीच्या गोष्टी यायला नको असेही राहुल गांधी यावेळी म्हणालेत.

हेही वाचा - पद्मश्री पुरस्काराने सन्मान झाल्यानंतर राहीबाई पोपेरे प्रथमच पोहचल्या साईबाबांच्या दरबारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.