ETV Bharat / city

Rana Couple Reached In Amravati : अमरावतीत पोहोचल्यानंतर राणा दाम्पत्याचे जल्लोषात स्वागत, कार्यकर्त्यांकडून दुग्धभिषेक

author img

By

Published : May 29, 2022, 9:34 AM IST

राणा दाम्पत्याचा दुग्धभिषेक
राणा दाम्पत्याचा दुग्धभिषेक

खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( Ravi Rana ) हे 36 दिवसानंतर अमरावतीतील आपल्या शंकरनगर येथील निवासस्थानी ( Rana Couple Reached In Amravati ) पोहोचले असता त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला.

अमरावती - खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( Ravi Rana ) हे 36 दिवसानंतर अमरावतीतील आपल्या शंकरनगर येथील निवासस्थानी ( Rana Couple Reached In Amravati ) पोहोचले असता त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. मंत्रोच्चारात करण्यात आलेल्या या दुग्धाभिषेक सोहळ्याला युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राणा दाम्पत्याचा दुग्धभिषेक

राणा दाम्पत्याचे अमरावतीत जल्लोषात स्वागत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठणासाठी गेलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे 14 दिवसाच्या तुरुंगवात होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीला जाऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली. 36 दिवस अमरावती बाहेर असणारे राणा दाम्पत्य आज अमरावती जिल्ह्यात परतले. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच राजकमल चौक येथे जल्लोषही करण्यात आला. दसरा मैदान लगतच्या हनुमान मंदिरात राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठण केले

निवासस्थानासमोर दुग्धाभिषेक सोहळा - खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा हा शंकरनगर ती त्यांच्या निवासस्थानी पोहोचले असताना कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

शिवसैनिकांकडून पोस्टरबाजी - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा 36 दिवसानंतर अमरावतीत परतले. 36 दिवस अमरावती बाहेर असणाऱ्या आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी राणा समर्थकांनी शहरभर स्वागताचे पोस्टर लावले असतानाच शिवसेनेच्यावतीने मात्र 36 दिवस बाहेर राहून अमरावतीला वार्‍यावर सोडणार्‍या या लोकप्रतिनिधींना कुठे काहीच सापडले नाही, शेवटी ते अमरावतीत परतले, अशा आशयाचे पोस्टर सर्वांचेच लक्ष वेधत आहे. आता राणा समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये पोस्टर वार सुरू झाले असल्याची चर्चा शहरात आहे.

हेही वाचा - Fourth Standard Boy Rape : धक्कादायक! चौथीतील मुलीवर आठ वर्षाच्या वर्गमित्राचा बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.