ETV Bharat / city

Devendra Bhuyar on Sanjay Raut : माझ्या वतीने संजय राऊत यांनी मतदान केले तरी हरकत नाही - आमदार देवेंद्र भुयार

author img

By

Published : Jun 18, 2022, 11:07 AM IST

मी राज्यातील महाविकास आघाडीचा घटक असून कायमच ( MLA Devendra Bhuyar comment on sanjay raut ) महाविकासआघाडी सोबतच ( MLA Devendra Bhuyar news Amravati ) राहणार आहे. माझ्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करणारे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे पुढच्या कुठल्याही ( MLA Devendra Bhuyar on maha vikas aghadi ) निवडणुकीत मी मतदान करताना माझ्यासोबत राहिले तरी मला हरकत नाही, असे आमदार भुयार म्हणाले.

MLA Devendra Bhuyar
आमदार देवेंद्र भुयार

अमरावती/नागपूर - मी राज्यातील महाविकास आघाडीचा घटक असून कायमच ( MLA Devendra Bhuyar comment on sanjay raut ) महाविकासआघाडी सोबतच ( MLA Devendra Bhuyar news Amravati ) राहणार आहे. माझ्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करणारे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे पुढच्या कुठल्याही ( MLA Devendra Bhuyar on maha vikas aghadi ) निवडणुकीत मी मतदान करताना माझ्यासोबत राहिले तरी मला हरकत नाही. किंबहुना माझ्या वतीने त्यांनीच मतदान केले तरी मला चालेल. याबाबत मी निवडणूक आयोगाकडेही विनंती करेल, असे मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटले.

माहिती देताना आमदार देवेंद्र भुयार

हेही वाचा - 'चला गाणी गाऊ या' अमरावतीत हौशी गायकांनी स्थापन केला क्लब

राज्यसभा निवडणुकीदरम्यान घेतला होता आक्षेप - शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या राज्यसभा सदस्य निवडणुकीत मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दगाफटका केला असल्याचा आरोप केला होता. यामुळे देवेंद्र भुयार यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असतानाच मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावतीत येऊन देवेंद्र भुयार यांच्याबाबत आम्हाला कुठलीही शंका नाही आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचाही आमदार देवेंद्र भुयार यांच्या बाबतचा गैरसमज दूर झाला असल्याचे म्हटले होते. असे असताना देखील आज आमदार देवेंद्र भुयार यांनी खासदार संजय राऊत यांच्या बाबत महत्त्वपूर्ण विधान केले.

महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचे काम - मी महाविकास आघाडीचा घटक आहे आणि राज्यात असणाऱ्या महाविकास आघाडीत तेढ निर्माण करणे यासोबतच मिठाचा खडा टाकण्याचे काम काही लोकांकडून सुरू झाले आहे. या कटाच्या मागचे मास्टर माइंड मात्र कोणी वेगळेच आहेत, असा आरोप देखील देवेंद्र भुयार यांनी केला आहे.

अपक्ष आमदाराला मतदान दाखवण्याचे बंधन ना राज्यसभेच्या निवडणुकीत होते न विधान परिषदेत असणार आहे. त्यामुळे, पुन्हा तोच आरोप होऊ नये की, आम्ही मतदान केले नाही. त्यामुळे, माझे मतदान दाखवण्याचा अधिकार संजय राऊत याना द्या किंवा माझ्या ऐवजी त्यांनाच मतदान करण्याचा अधिकार द्या, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडणार असल्याचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केली.

राज्यसभेच्या निवडणुकीत मागील वेळी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरूनच महाविकास आघाडीला मतदान केले. तरीही आरोप आमच्यावर लागला. त्यामुळे, या उद्भवलेल्या प्रश्नांमुळे आमचे जनतेच्या प्रश्नांकडे, मतदारसंघाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे, तो आरोप होऊ नये, खबरदारी म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.

यासंदर्भात स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवार साहेब यांच्याशी भेटलो. त्यावेळी संजय राऊत यांनी गैरसमजुतीतून चुकीचे वक्तव्य केले होते. मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत लोकसभा निवडणुकीपासून आहे. त्यामुळे, अविश्वास दाखवणे संयुक्तिक नसल्याचे खुद्द शरद पवार म्हणाले असल्याचेही आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले. या आरोपानंतर संजय राऊत यांच्याशी सुद्धा बोललो. माझा गैरसमज झाला होता, असेही ते म्हणाल्याचे भुयार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यांना विदर्भातील लोक आवडत नाही? - मुख्यमंत्री यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी वेळ मागितला, तो मिळाला नाही, असेही भुयार म्हणालेत. अडीच वर्षे बाकी आहे, वेळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. पण, मुख्यमंत्री विदर्भातील अपक्ष आमदारांना वेळ देत नाही का? असा प्रश्न केला असता त्यांना विदर्भातले लोक आवडत नाही की काय हे समजत नसल्याचे आमदार भुयार म्हणालेत. मागील अडीच वर्षांत असे जाणवत आहे की विदर्भाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुर्लक्ष होत आहे. कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही आपले गाऱ्हाणे मुख्यमंत्री यांच्यापुढे मांडत राहू, असेही देवेंद्र भुयार म्हणालेत.

हेही वाचा - SSC Result Declared : अमरावती विभागाचा 96. 81 टक्के निकाल; गुणपडताळणी 20 ते 29 जून दरम्यान करता येणार अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.