ETV Bharat / city

Cemetery Scam Amravati : अस्तित्वात नसलेल्या स्मशानभूमीसाठी लाखो रुपये खर्च; माजी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल

author img

By

Published : Apr 27, 2022, 3:33 PM IST

Updated : Apr 27, 2022, 3:45 PM IST

अमरावतीत अस्तित्वात नसलेल्या स्मशानभूमीसाठी ( Cemetery scam Amravati ) लाखो रुपय खर्च करण्यात आले आहे. युवक काँग्रेसच्या ( Youth Congress ) वतीने अमरावतीचे माजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल ( Former Collector Shailesh Nawal ) यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा खनिकर्म अधिकारी यासह अमरावती आणि अचलपूर येथील मजूर सहकारी संस्थे विरोधात गाडगे नगर पोलीस ठाण्यासह राजापेठ ( Complaint to Gadge Nagar Police Station and Rajapeth Police Station ) पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

गाडगेनगर पोलीस
गाडगेनगर पोलीस

अमरावती - शहरात अस्तित्वात नसलेल्या दोन स्मशानभूमीच्या ( Cemetery scam Amravati ) नावाने कोविड काळात चक्क 47 लाख 98 हजार 400 रुपये खर्च करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घोटाळ्यासंदर्भात युवक काँग्रेसच्या ( Youth Congress ) वतीने अमरावतीचे माजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल ( Former Collector Shailesh Nawal ) यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा खनिकर्म अधिकारी यासह अमरावती आणि अचलपूर येथील मजूर सहकारी संस्थे विरोधात गाडगे नगर पोलीस ठाण्यासह राजापेठ ( Complaint to Gadge Nagar Police Station and Rajapeth Police Station ) पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया


काय आहे प्रकरण ? : कोविड काळात अमरावती शहर आणि जिल्ह्यातील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यावेळी स्मशानभूमी सुद्धा अपुरी पडत असल्यामुळे स्मशानभूमी विकासासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. अमरावती शहरातील मोक्षधाम आणि मुक्तिधाम या दोन स्मशानभूमीच्या विकासासाठी 47 लाख 98 हजार 400 रुपयांचा प्ले न्यू 18, 14 क्रमांकाचा धनादेश स्टेट बँक ऑफ इंडियाने वितरित केला आहे. ज्यांच्या नावाने हा धनादेश निघाला आहे, त्या स्मशानभूमी अमरावती शहरात अस्तित्वात नसल्याचा आरोप युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ यांनी केला असून यासंदर्भात त्यांनी गाडगेनगर आणि राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


संबंधितांवर कारवाई : स्मशानभूमीच्या नावाने घोटाळा करणाऱ्या माजी जिल्हाधिकारी यांचा संबंधित सर्व अधिकारी तसेच मजूर सहकारी संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्य विरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी समीर जवंजाळ यांच्यासह युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. स्मशानभूमीच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करणे हा गंभीर विषय असून यासंदर्भात आता पोलीस काय भूमिका घेणार याकडे अमरावतीकरांचा लक्ष लागले आहे.

हेही वाचा - High Court Relife To Bhujbal: ईडीला झटका; भुजबळ कुटुंबियांना पासपोर्ट परत करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश

Last Updated :Apr 27, 2022, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.