ETV Bharat / city

Amravati Rain:अमरावतीत मुसळधार पाऊस; अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

author img

By

Published : Jul 23, 2022, 11:07 AM IST

Amravati Rain
अमरावतीत मुसळधार पाऊस

अमरावती जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार ( Heavy rain in Amravati ) पाऊस कोसळत आहे. दोन दिवस पावसाने उसंत घेतल्यावर शुक्रवारी सायंकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. तर अप्पर वर्धा धरणाची जलपातळी ( Water level ofWater level of Wardha Dam ) 78.27% इतकी भरली असून या धरणाचे 13 पैकी तीन दार उघडण्यात आले आहे.

अमरावती : शुक्रवारी रात्री जिल्ह्यात विविध भागात मुसळधार पाऊस कोसळला. तसेच पहाटेपासून अमरावती शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस पडत आहे. तर अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा ( Water level of Wardha Dam )या सर्वात मोठ्या धरणाची जलपातळी 78.27% इतकी भरली असून या धरणाचे 13 पैकी तीन दार उघडण्यात आले आहे.

अमरावतीत मुसळधार पाऊस

अनेक प्रकल्पाचे दारे उघडण्यात आली - अप्पर वर्धा धरण परिसरात 44 पाऊस कोसला असून मध्य प्रदेशातून वाहून येणाऱ्या नद्यांमुळे हा प्रकल्प तुडुंब भरला आहे. अप्पर वर्धा धरणाप्रमाणेच विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा धरणाचे दोन दारे उघडण्यात आली आहेत. यासह अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पाचे दोन दार 30 सेंटीमीटर पर्यंत उघडण्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणाचे दोन दारं दहा सेंटीमीटर पर्यंत उघडण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील शहानुर धरणाची चार धार 10 सेंटीमीटर पर्यंत तसेच चंद्रभागा हा मध्यम प्रकल्प 73.53% इतका भरला असून या प्रकल्पाची तीन दार उघडण्यात आली आहे .यासह पूर्णा, सापन या धरणांची दारे देखील उघडण्यात आल्यामुळे या धरणाच्या परिसरातील गावांना पुराचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.



अमरावती जिल्ह्यात या भागात भीषण परिस्थिती - मुसळधार पावसामुळे चांदूरबाजार, भातकुली, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. विश्रोळी धरणातील पाणी सोडण्यात आल्यामुळे पेढी नदीला पूर आल्याने या नदीकाठी असणाऱ्या कुंड सर्जापूर, सावरखेड या गावांना पुराचा फटका बसला असून अमरावती चांदूर बाजार या मार्गावरील पुलावरून पाणी जात आहे. या परिसरातील पूसदा ,नांदुरा , सलोरा, गोपाळपूर या गावांना सावत्तेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात गट 15 दिवसांपासून अशीच परिस्थिती असल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. मेळघाटात देखील गत पंधरा दिवसांपासून सलग पाऊस कोसळत असून मेघाटातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सेमाडोह, हरिसाल या अमरावती धारणी मार्गावरील गावांसह लगतच्या आदिवासी गावांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : Sangli Rain : चांदोलीत सातव्या दिवशीही अतिवृष्टी कायम; धरणात 72 टक्के पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.