ETV Bharat / city

Amravati Muncipal Corporation : अमरावती महापालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; नगरसेवकांमध्ये झडप

author img

By

Published : Feb 17, 2022, 3:45 PM IST

Updated : Feb 17, 2022, 4:04 PM IST

सफाई ठेक्याच्या विषयावरून अमरावती महापालिकेच्या आमसभेत ( Amravati Muncipal Corporation ) आज चांगलाच गदारोळ झाला. विशेष म्हणजे एमआयएमचे गटनेते अब्दुल नाझीम अब्दुल रौफ ( Amravati Cleaning Contract Dispute ) हे चेतन पवार यांच्या अंगावर चालून गेल्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Amravati Muncipal Corporation
Amravati Muncipal Corporation

अमरावती - सफाई ठेक्याच्या विषयावरून अमरावती महापालिकेच्या आमसभेत ( Amravati Muncipal Corporation ) आज चांगलाच गदारोळ झाला. विशेष म्हणजे एमआयएमचे गटनेते अब्दुल नाझीम अब्दुल रौफ ( Amravati Cleaning Contract Dispute ) हे चेतन पवार यांच्या अंगावर चालून गेल्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सफाई कंत्राटाच्या विषयावरून वाद

अमरावती महापालिकेत सध्या चार सदस्यीय प्रभाग प्रणाली आहे. या प्रभाग प्रणाली नुसारच सफाईचा कंत्राट देण्यात आला आहे. आता येणारी निवडणूक तीन प्रभागीय सदस्य रचनेनुसार होणार असून सफाईचा कंत्राट बदलण्यात यावा, अशी भूमिका भाजपाच्या नगरसेवकांनी घेतली. दरम्यान, हा निर्णय निवडणुकीनंतर नवीन सदस्य आल्यावर आमसभेत घेता येईल. मात्र, आता हा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. तसेच ज्या कंत्राटदाराकडे सध्या सफाईचा कंत्राट आहे. त्या कंत्राटदाराने कोरोना काळात शहरात केलेल्या सफाईच्या कामाची सर्वांनीच कौतुक केले. आता या कंत्राटदाराचा करार रद्द करणे योग्य नाही, अशी भूमिका काँग्रेसचे विलास इंगोले माजी महापौर मिलिंद चिमोटे, शिवसेनेचे प्रशांत वानखडे यांनी घेतली. दरम्यान रिपाईचे गटनेता प्रकाश बनसोडे यांनी कंत्राटदाराला नियमानुसार दहा टक्के वाढ देता येईल का, याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना विचारले असता बसपाचे गटनेते चेतन पवार यांनी याबाबत आक्षेप घेतला.

अन नगरसेवक एकमेकांवर धाऊन आले -

सफाई कामगारांच्या विषयावरून आज सभागृहात काही नगरसेवक कंत्राटदाराची वकिली का करत आहेत, असा सवाल बसपाचे गटनेते चेतन पवार यांनी उपस्थित केला. चेतन पवार यांच्या या वक्तव्यावर रिपाईचे प्रकाश बनसोड यांनी आक्षेप घेतला. एमआयएमचे गटनेते अब्दुल नाझीम अब्दुल रौफ यांनी चेतन पवार यांनी वापरलेला शब्द मागे घ्यावा, असे मागणी केली. चेतन पवार यांनी नकार देताच अब्दुल नाझीम अब्दुल रौफ हे चेतन पवार यांच्या दिशेने धाऊन आले. दोघांनीही एकमेकांना पकडले असता, इतर नगरसेवकांनीही दोघांनाही एकमेकांपासून दूर केले. या संपूर्ण प्रकारामुळे महापालिकेच्या सभागृहात तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा - Municipal Commissioner Ink Thrown Case : राजापेठ उड्डाणपूल परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, आमदार राणा यांना अटक करण्यासाठी पोलिसांची तयारी

Last Updated :Feb 17, 2022, 4:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.