ETV Bharat / business

Share Market Update : आज सेन्सेक्स सुरुवातीलाच 196 अंकांनी घसरला, निफ्टीतही घसरण

author img

By

Published : Feb 13, 2023, 12:35 PM IST

Share Market
शेयर मार्केट

आज शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 196 अंकांची घसरण नोंदवली. त्याचवेळी निफ्टीही 1.80 अंकांनी घसरला.

मुंबई : आशियाई बाजारातील संमिश्र संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या बेंचमार्क निर्देशांकांसह सोमवारी सकाळच्या सत्रात इक्विटी बाजारात अस्थिरता होती. या आठवड्याची सुरुवात अस्थिरतेने झाली आहे. बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स 196.61 अंकांनी किंवा 0.32 टक्क्यांनी घसरून 60,486.09 वर, तर एनएसईचा निफ्टी 38.50 अंक किंवा 0.22 टक्क्यांनी घसरून 17,818 वर आला आहे.

आयटी कंपन्यांचे शेअर्स नकारात्मक क्षेत्रात : सकाळच्या सत्रात, सेन्सेक्समधील 18 शेअर्स नकारात्मक क्षेत्रात होते ज्यात इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि विप्रो यासह बहुतांश आयटी कंपन्यांच्या शेअर्सचा समभाग होता. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्हीके विजयकुमार म्हणाले की, बाजाराची कोणतीही स्पष्ट दिशा नाही. नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही चिन्हे आहेत. डॉलर निर्देशांकात 103.7 पर्यंत वाढ होणे आणि रोखे उत्पन्न वाढणे हे उदयोन्मुख बाजार समभागांसाठी प्रतिकूल आहेत. वाढणारे उत्पन्न हे दर्शविते की दर दीर्घ कालावधीसाठी स्थिर राहतील. तसेच, ब्रेंट क्रूड 86 डॉलरच्या आसपास वाढले आहे, जो भारतासाठी व्यापक चिंतेचा विषय आहे.

चीन सकारात्मक झोनमध्ये : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) 10 फेब्रुवारी रोजी निव्वळ खरेदीदार होते. त्यांनी 1,458.02 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. देशांतर्गत बाजारासाठी FPIs ची विक्री सकारात्मक आहे. जपान आणि हाँगकाँगसह बहुतांश आशियाई बाजार लाल तर चीन सकारात्मक झोनमध्ये होते. शुक्रवारी अमेरिकन बाजार संमिश्र कलसह बंद झाले, तर युरोपीय बाजार घसरणीसह बंद झाले.

भारत चीनमधील व्यापार वाढला : भारत आणि चीन दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून तणावाची परिस्थिती आहे मात्र तरीही या दोन देशांमधील व्यापार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता दोन्ही देशांमधील एकूण व्यापार 125 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. भारताकडून चीनमध्ये ९७.५ अब्ज डॉलरची निर्यात होत आहे. त्यामुळे दोन्ही देशांचा व्यापार वाढलेला आहे. नुकतेच केंद्र सरकारने चीनवर डिजिटल स्ट्राइक करत सुमारे 200 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. यात 138 बेटिंग अ‍ॅप्स आणि 94 कर्ज देणारे अ‍ॅप्स आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने आयटी मंत्रालयाला अलीकडेच अशा अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते, जे थर्ड पार्टी लिंकद्वारे ऑपरेट केले जातात. सूत्रांनी सांगितले की, हे सर्व अ‍ॅप्स आयटी कायद्याच्या कलम 69 चे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहेत आणि त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका उद्भावू शकतो.

हेही वाचा : Today Cryptocurrency Price : बिटकॉइन, इथेरिअमच्या दरात घसरण; गुंतणवूक करण्याआधी एकदा पाहा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.