ETV Bharat / business

RBI Raises Repo Rate : कर्ज महागण्याची शक्यता.. रिजर्व बॅंकेने रेपो रेटचे दर वाढवले

author img

By

Published : Feb 8, 2023, 10:17 AM IST

Updated : Feb 8, 2023, 10:59 AM IST

भारतीय रिजर्व बॅंकेने रेपो रेटच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. 2022 पासून सलग 6 वेळा रेपो रेट मध्ये वाढ झाली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली.

RBI
भारतीय रिजर्व बॅंक

मुंबई : भारतीय रिझर्व बॅंकेने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवून 6.5 टक्के केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) बुधवारी मुख्य बेंचमार्क व्याजदर 25 आधार अंकांनी 6.5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. एमपीसीच्या सहा पैकी चार सदस्यांनी ही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली.

2022 पासून 6 वेळा वाढ : 2022 पासून सलग 6 वेळा रेपो रेट मध्ये वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये रिझर्व बँकेने रेपो रेट 35 बेस पॉइंट्सने वाढवला होता. त्या आधी त्यात सलग तीन वेळा 50 पॉइंट्सने वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षी मे महिन्यापासून आरबीआयने अल्पकालीन कर्जदरात 225 पॉईन्ट्सने वाढ केली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या उद्रेकानंतर जागतिक पुरवठा साखळीत आलेल्या व्यत्ययामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शक्तीकांत दास म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्था आता पूर्वपदावर येत असून महागाई कमी होते आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक राहिली.

महागाई दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज : गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, अल्प जागतिक मागणी आणि सध्याचे आर्थिक वातावरण हे देशांतर्गत ग्रोथवर परिणाम करेल. मूळ चलनवाढ कायम असून आरबीआयची सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर करडी नजर आहे. रिझर्व्ह बँकेने 2023-24 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 6.4 टक्के वर्तवला असून महागाई दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 2023-24 साठी वास्तविक जीडीपी वाढ 6.4 टक्के आणि Q1 साठी 7.8 टक्के, Q2 6.2 टक्के, Q3 6 टक्के आणि Q4 5.8 टक्के असा अंदाज आहे.

गृहकर्ज EMI वर काय परिणाम होईल : तुम्ही गृहकर्ज घेतले तर तुमच्या EMI वर किती परिणाम होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. समजा तुम्ही 20 वर्षांसाठी 25 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे, ज्यावर 7.0 टक्के व्याज आहे. यामुळे तुमचा मासिक ईएमआय 19,382 रुपये होईल. या व्याजदरासह, तुम्हाला अतिरिक्त २१,५१,७९४ रुपये द्यावे लागतील आणि २५ लाखांच्या कर्जावरील तुमची एकूण देय रक्कम ४६,५१,७९४ रुपये असेल. पण आता रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढल्याने तुमच्या कर्जाचा व्याजदरही 0.25 टक्क्यांनी वाढणार आहे.

हेही वाचा : Claim Settlement Ratio : जीवन विमा घेण्यापूर्वी तपासा क्लेम सेटलमेंट रेशो

Last Updated :Feb 8, 2023, 10:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.