ETV Bharat / business

Share Market Update : बँकिंग शेअर्सच्या खरेदीमुळे शेअर बाजार तेजीसह बंद

author img

By

Published : Apr 11, 2023, 5:54 PM IST

Share Market
शेअर बाजार

शेअर बाजारात आजच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्रात विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच आजच्या व्यवहारात स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये देखील तेजी दिसून आली.

मुंबई : भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवारचा दिवस अतिशय शुभ ठरला. बँकिंग शेअर्समधील तेजीमुळे सेन्सेक्सने आज 300 अंकाचा टप्पा पार केला. आजच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 311 अंकांच्या वाढीसह 60,157 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 98 अंकांच्या वाढीसह 17,722 अंकांवर बंद झाला. आज बाजारातील तेजीच्या परिणामामुळे सेन्सेक्स पुन्हा 60,000 चा आकडा पार करण्यात यशस्वी झाला आहे.

विविध सेक्टर्सची स्थिती : आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा, ऑइल अँड गॅस, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. तर आयटी, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स मात्र घसरले. आजच्या व्यवहारात स्मॉलकॅप तसेच मिडकॅप शेअर्समध्ये देखील तेजी दिसून आली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 39 तेजीत आणि 11 तोट्यासह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर्स तेजीत आणि 10 तोट्यासह बंद झाले.

या शेअर्समध्ये चढ - उतार : आजच्या व्यवहारात कोटक महिंद्रा बँक 5 टक्के, टाटा स्टील 2.43 टक्के, आयटीसी 1.90 टक्के, आयसीआयसीआय बँक 1.65 टक्के, मारुती सुझुकी 1.42 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.41 टक्के आणि महिंद्रा अँड महिंद्रा 1.2 टक्के वाढीसह बंद झाले. तर टीसीएस 1.50 टक्के, इन्फोसिस 1.42 टक्के, एचसीएल 1.41 टक्क्यांनी घसरले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ : आजच्या व्यापार सत्रातही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपनीचे बाजार भांडवल वाढून 264.52 लाख कोटी झाले रुपये झाले आहे. हे भांडवल सोमवारी 263.13 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.39 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे. आज बाजारात बिटकॉइनचा दर 24,72,313 रुपये होता, तर इथेरिअमचा दर 1,57,745 रुपये एवढा होता. तसेच आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 55,400 रुपये होता, तर 1 किलो चांदीचा दर 76,300 रुपये होता.

हे ही वाचा : Today Petrol Diesel Rates: एका क्लिकवर जाणून घ्या, आजचे पेट्रोल डिझेल, सोने चांदी, क्रिप्टोकरन्सी व भाज्यांचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.