ETV Bharat / business

अर्थव्यवस्थेच्या विकासदराला 1979 नंतरचे सर्वात मोठे खिंडार पडण्याची शक्यता

author img

By

Published : Aug 29, 2020, 1:59 PM IST

कोरोना महामारीत आर्थिक विकासदराची पहिल्यांदाच संपूर्ण आकडेवारी सोमवारी जाहीर होणार आहे. त्यामधून कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला, हे समजू शकणार आहे. विविध बँका आणि संस्थांच्या मत देशाचा जीडीपी हा चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत किमान १५ ते २० टक्के घसरणार आहे.

प्रतिकात्मक-जीडीपी
प्रतिकात्मक-जीडीपी

हैदराबाद - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील देशाच्या सकल उत्पन्नाची (जीडीपी) आकडेवारी सोमवारी (३१ ऑगस्ट) केंद्रीय सांख्यिकी कार्यालय जाहीर करणार आहे. यामध्ये पहिल्या तिमाहीचा विकासदर हा १९७९ नंतर सर्वाधिक घसरणार असल्याचा अंदाज आहे.

कोरोना महामारीत आर्थिक विकासदराची पहिल्यांदाच संपूर्ण आकडेवारी सोमवारी जाहीर होणार आहे. त्यामधून कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला, हे समजू शकणार आहे. विविध बँका आणि संस्थांच्या मत देशाचा जीडीपी हा चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत किमान १५ ते २० टक्के घसरणार आहे. ही १९७९ नंतरची तिमाहीच्या विकासदरामधील सर्वाधिक मोठी घसरण असणार आहे. देशाचा विकासदर १९७९ मध्ये उणे ५.२ टक्के झाला होता.

हेही वाचा- आर्थिक सुधारणांचे 'हरित कोंब' फार थोड्या कालावधीसाठी टिकणार

कोरोना महामारीपूर्वी आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जानेवारी ते मार्च तिमाहीत विकासदर हा ३.१ टक्के होता. तर संपूर्ण आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये विकासदर हा त्यामागील ११ वर्षात सर्वात कमी ४.२ टक्के राहिला होता. कोरोना महामारीमुळे देशात २५ मार्च २०२० ला टाळेबंदी लागू केल्यानंतर देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे.

हेही वाचा-'मागील सरकारने राज्य व केंद्रात अविश्वास निर्माण केला'

जीडीपी घसरण्याचा अंदाज

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इकोरॅपच्या ऑगस्टमधील अहवालानुसार चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदर हा १६.५ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे. त्यापूर्वी इकोरॅपने विकासदर हा २० टक्के घसरेल असा अंदाज केला होता. शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या वित्तीय आणि बिगर वित्तीय कंपन्यांवर मोठा वाईट परिणाम होणार नसल्याचे अहवालात म्हटले आहे. पतमानांकन संस्थांसह भारतीय औद्योगिक महासंघाने (फिक्की) चालू आर्थिक वर्षात विकासदर हा उणे ४.५ टक्के राहणार असल्याचा जुलैमध्ये अंदाज केला आहे.

हेही वाचा-अर्थव्यवस्थेचे देवावर खापर फोडणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांना पी. चिदंबरम यांचा टोला, म्हणाले...

देशाचा औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकात (आयआयपी) जूनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १६.६ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मे महिन्यात ३३.८ टक्के तर एप्रिलमध्ये ५७.६ टक्क्यांची औद्योगिक उत्पादन निर्देशांकात घसरण झाली आहे. हे आकडेवारी लक्षात घेता चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपीच्या घसरणीची आकडेवारी चिंता वाढविणारी असल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.