ETV Bharat / business

टाटा मोटर्सला विदेशातील व्यवसायातही फटका, वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये ३२ टक्क्यांची घट

author img

By

Published : Sep 11, 2019, 6:28 PM IST

टाटा मोटर्सच्या जग्वार लँड रोव्हर या वाहनांसह इतर ७२ हजार ४६४ वाहनांची ऑगस्टमध्ये  विक्री झाली. तर गतवर्षी १ लाख ७ हजार ३० वाहनांची विक्री झाली होती.

संग्रहित - टाटा मोटर्स

नवी दिल्ली - देशात वाहन उद्योग मंदीमधून जात असताना टाटा मोटर्सला विदेशातील व्यवसायातही फटका बसला आहे. टाटा मोटर्सच्या विदेशातील विक्रीत ऑगस्टमध्ये ३२ टक्के घसरण झाली आहे.

टाटा मोटर्सच्या जग्वार लँड रोव्हर या वाहनांसह इतर ७२ हजार ४६४ वाहनांची ऑगस्टमध्ये विक्री झाली. तर गतवर्षी १ लाख ७ हजार ३० वाहनांची विक्री झाली होती.

हेही वाचा-मंदीचे सावट.. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये १० टक्क्यांची घसरण, गेल्या ५२ आठवड्यातील निचांक

टाटा मोटर्सच्या सर्व व्यवसायिक वाहन प्रकार आणि टाटा डेवू श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत ४५ टक्के घसरण झाली आहे. चालू वर्षात २५ हजार ३६६ वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी ४५ हजार ७१९ वाहनांची विक्री झाली होती, असे कंपनीने म्हटले आहे. तर विदेशामधील प्रवासी वाहनांच्या विक्रीत २२ टक्के घसरण झाली आहे.

हेही वाचा-आर्थिक मंदीची झळ; टाटा मोटर्सचे पुण्यातील केंद्र ८ दिवस राहणार बंद !


देशात वाहन उद्योगात मंदीचे चित्र
देशातील कारच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ४१.०९ टक्क्यांची घसरण झाली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये देशात १ लाख ९६ हजार ८४७ कारची विक्री झाली होती. चालू वर्षात ऑगस्टमध्ये कारची विक्री कमी होवून १ लाख १५ हजार ९५७ कारची विक्री झाली आहे. ही आकडेवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) सोमवारी जाहीर केली आहे.

Intro:Body:

dummy


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.