ETV Bharat / business

नेटफ्लिक्स करणार टिकटॉकशी तगडी स्पर्धा; लाँच केले फास्ट लाफ्स अॅप

author img

By

Published : Mar 5, 2021, 3:32 PM IST

Fast Laughs
फास्ट लाफ्स

‌फास्ट लाफ्स हे केवळ आयओएस डिव्हाईसवर आणि निवडक देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. हे अॅप टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रील्ससारखे आहे.

नवी दिल्ली - व्हिडीओ स्ट्रिमींगमध्ये आघाडीवर असलेल्या नेटफ्लिक्सने टिकटॉकशी स्पर्धा करणारे अॅप काढले आहे. फास्ट लाफ्स असे या अॅपचे नाव आहे. अॅपमध्ये विनोदी संवादाच्या लघू व्हिडिओ क्लिप्स या फुल स्क्रीनमध्ये दिसू शकणार आहेत.

फास्ट लाफ्स हे केवळ आयओएस डिव्हाईसवर आणि निवडक देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. हे अॅप टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रील्ससारखे आहे. फास्ट लाफ्समध्ये बिग माउथ आणि स्टँड-अपमधील व्हिडिओच्या क्लिप आहेत. आवडीचे कलाकार, शो, चित्रपट यांचे व्हिडिओ क्लिप्स जतन करून पुन्हा पाहता येणे शक्य आहे.

‌फास्ट लाफ्स

हेही वाचा-रिलायन्सकडून सर्व कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफत लस

फास्ट लाफ्समध्ये मर्डर मिस्ट्रीसारखे फुल स्क्रीन चित्रपट आहेत. यामधील लघू व्हिडिओ क्लिप्स वापरकर्त्याला व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आणि ट्विटर शेअर करता येणार आहेत. या अॅपची लवकरच अँड्राईड वापरकर्त्यांसाठी चाचणी घेण्यात येणार आहे.

हेही वाचा- स्टारलिंक इंटरनेटच्या सेवेकरता भारतामध्ये आगाऊ नोंदणी सुरू

दरम्यान, भारतामध्ये टिकटॉकवर बंदी असली तरी अमेरिकासह जगभरात देशात टिकटॉकला परवानगी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.