ETV Bharat / business

विदेशात बेपत्ता झालेल्या मेहुल चोक्सीचा शोध; सीबीआय इंटरपोलची घेणार मदत

author img

By

Published : May 25, 2021, 4:08 PM IST

Updated : May 25, 2021, 4:26 PM IST

Mehul Choksi
मेहुल चोक्सी

मागील आठवड्यात मेहुल बेटावरील दक्षिण भागात असलेल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये रात्री जेवण्यासाठी गेला होता. त्याचे वाहन हे जॉली जहाज बंदरावर आढळले होते. मात्र, चोक्सी आढळला नसल्याचे अँटीग्वातील एका माध्यमाने म्हटले आहे.

वी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी हा अँटिग्वा अँड बारबुडा देशातून बेपत्ता झाल्यानंतर सीबीआय सक्रिय झाली आहे. सीबीआयने तपास करत भारतामधील अँटिग्वा राजदूत कार्यालयाशी संपर्क साधला आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अँटिग्वा राजदूत कार्यालयाशी संपर्क साधून मेहुल चोक्सी बेपत्ता झाल्याची खात्री करून घेतली आहे. राजनैतिक मार्गाने अधिक माहिती मिळणार असल्याचे सूत्राने सांगितले. मेहुल चोक्सी बेपत्ता होणे ही गंभीर बाब असल्याचे सीबीआयच्या सूत्राने म्हटले आहे. मेहुल बेपत्ता झाल्याच्या वृत्ताची सीबीआयने नोंद घेतली आहे. सीबीआय वस्तुस्थितीची पडताळणी करत आहे.

हेही वाचा-ओडिशा : मलकानगिरीमध्ये दोन बोटी बुडाल्या; एक ठार, सात बेपत्ता

कुटुंबाची वाढली चिंता

सीबीआय ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रिय होत आहे. जर मेहुल हा बेपत्ता झाल्याचे खरे असल्यास त्याचे ठिकाण शोधून काढण्यासाठी सीबीआय इंटरपोलची मदत घेणार असल्याचे सूत्राने सांगितले. मेहुल चोक्सी बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबिय चिंताग्रस्त झाल्याची माहिती चोक्सीच्या वकिलांनी दिली. त्यांच्या कुटुंबियांनी चर्चेसाठी बोलाविले आहे. अँटिगा पोलीस हे तपास करत आहेत. कुटुंब हे अंधारात असून त्याच्या सुरक्षिततेबाबत चिंताग्रस्त आहेत.

हेही वाचा-गोवा राज्यात स्मार्ट कामगार कार्ड सुविधेची सुरुवात, कामगारांना कार्ड घेण्याचं मुख्यमंत्र्यांचे आवाहन

जेवण्यासाठी गेल्यानंतर झाला बेपत्ता

मागील आठवड्यात मेहुल बेटावरील दक्षिण भागात असलेल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये रात्री जेवण्यासाठी गेला होता. त्याचे वाहन हे जॉली जहाज बंदरावर आढळले होते. मात्र, चोक्सी आढळला नसल्याचे अँटीग्वातील एका माध्यमाने म्हटले आहे.

आधीच घेतले कॅरेबियन बेटांवरील देशाचे नागरिकत्व..

२०१८मध्ये भारतातून फरार होण्यापूर्वीच २०१७मध्ये चोक्सीने कॅरेबियन बेटांवरील अँटिग्वा अँड बारबुडा देशाचे नागरिकत्व घेतले होते. रविवारी तो देशाच्या दक्षिण भागात गाडी चालवताना दिसून आला होता. त्यानंतर त्याची गाडी आढळून आली, मात्र तो कुठे आहे याची माहिती मिळाली नाही. चोक्सीच्या वकिलांना याबाबत विचारणा केली असता त्यांनीही काही माहिती देण्यास नकार दिला.

हेही वाचा-फेसबुक-ट्विटरसह इतर सोशल मीडिया उद्यापासून बंद?

१३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा..

मेहूल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करुन १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधील एका तुरुंगात बंद आहे. या दोघांविरोधात सीबीआय तपास करत आहे.

ईडीकडून संपत्ती जप्त..

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये मेहुल चोक्सी याची मुंबईतील १४ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली होती. मुंबईच्या गोरेगाव परिसरातील १ हजार ४६० स्क्वेअर फुटांचा एक फ्लॅट, सोन्या-प्लॅटिनमचे दागिने, हिरे, चांदी, काही मौल्यवान मूर्ती, महागडे घड्याळ, मर्सिडीज बेंझ गाडी या बाबींचा जप्त केलेल्या गोष्टींमध्ये समावेश आहे.

Last Updated :May 25, 2021, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.