ETV Bharat / briefs

अंतिम वर्षाच्या परीक्षेवर महाधिवक्ताचे मत मुख्यमंत्र्यांना कळवणार - उदय सामंत

author img

By

Published : Jun 16, 2020, 6:05 PM IST

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (16 जून) दुपारी राज्यातील विद्यापीठ आणि त्याअंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्याचे महाधिवक्ता यांची भेट घेतली. यावेळी परीक्षा रद्द केल्यास कायदेशीर अडचणी काय असतील. या संदर्भातील माहिती सामंत यांनी जाणून घेतली.

mumbai news
final year exam issue

मुंबई - अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान मिळाले तर त्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध असतील, याबाबत मंगळवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याकडून मत जाणून घेतले. या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेतील माहिती सामंत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून देणार आहेत. त्यानंतरच राज्य सरकारकडून अंतिम वर्षाच्या परीक्षेवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (16 जून) दुपारी राज्यातील विद्यापीठ आणि त्याअंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्याचे महाधिवक्ता यांची भेट घेतली. यावेळी परीक्षा रद्द केल्यास कायदेशीर अडचणी काय असतील. या संदर्भातील माहिती सामंत यांनी जाणून घेतली. राज्यात कोरोनाचे संकट आणि त्याचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढत असून त्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे म्हणजेच विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होणार आहे. त्यामुळे आपण या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर अजूनही ठाम असल्याचे यावेळी सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, परीक्षा रद्द् करण्याच्या निर्णयावरून राज्यात भाजपाकडून राजकारण होत असले तरी मला विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांचे हित महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि त्यावर राजकारण करणाऱ्या लोकांबद्दल मला फार काही बोलायचे नाही, असे सामंत म्हणाले. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थी हितासाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या एटीकेटीचा (ATKT) प्रश्न आहे, तो प्रश्न सुद्धा सोडवला जाईल आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचे हित साधले जाईल, असेही सामंत म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.