ETV Bharat / briefs

चंद्रपूरच्या आमडी शेतशिवारात टोळधाडीचे आक्रमण

author img

By

Published : Jun 3, 2020, 8:29 PM IST

chandrapur news
locust attack on aamdi village at chandrapur district

टोळधाड हिरवी पाने, फुले, फळे, बिया यांचा फडशा पाडतात. खरीप हंगामातील पिकांनाही या किडीचा धोका होण्याची शक्यता आहे. टोळधाड आल्यास समुहाच्या वाटेवर 2 ते 3 फूट खोल चर काढून, शेतात मशाली पेटवून आणि टायर जाळून धूर करावा. तसेच थाळी वाजवून टोळ नियंत्रणात आणू शकतो. याबाबत कृषि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

चंद्रपूर - चिमूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या आमडी बेगडे येथील शेतकऱ्याच्या शेतात टोळधाडीने आक्रमण केले आहे. या टोळधाडीने शेतकऱ्याच्या उभ्या पीकाचे नुकसान केले आहे. शेती हंगामा अगोदरच टोळधाडीचे पिकावर आक्रमण झाल्याने आमडी परिसरातील शेतकरी पुरता हादरला आहे.

आमडी येथील शेतकरी शालीक विटाळे, रत्नाकर विटाळे, राजू पाटील झाडे, विजय नामदेव शेंडे, अनंता गलांडे,मोहन झाडे,अमृत गाठे, राजू झिकार, नंदकिशोर चदनखेडे या शेतकऱ्यांच्या शेतात टोळधाडीने आक्रमण केले आहे. या संदर्भात कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता 1 जून ला कृषि विज्ञान केंद्र शिंदेवाहीचे वरिष्ठ किटक शास्त्रज्ञ डॉ. राठोड आणि डॉ विनोद नागदेवते तसेच वरोरा उपविभागीय कृषि अधिकारी शिंदेवाही यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली असता टोलधाडीचे प्रमाण अत्यंत अल्प असून ही टोळधाड भटकून आली. तेव्हा शेतकऱ्यांनी घाबरून न जाता तिला हाकलून लावण्याचे व नष्ट करण्यासाठीचे उपाय सांगून योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

ही टोळधाड हिरवी पाने, फुले, फळे, बिया यांचा फडशा पाडतात. खरीप हंगामातील पिकांनाही या किडीचा धोका होण्याची शक्यता आहे. टोळधाड आल्यास समुहाच्या वाटेवर 2 ते 3 फूट खोल चर काढून, शेतात मशाली पेटवून आणि टायर जाळून धूर करावा. तसेच थाळी वाजवून टोळ नियंत्रणात आणू शकतो. याबाबत कृषि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.