ETV Bharat / bharat

WORLD LION DAY : 'गीर' सिंहांची आशियातील सर्वात सुरक्षित भूमी

author img

By

Published : Aug 10, 2021, 10:49 AM IST

आशियाई सिंहांची संख्या 1910 आणि 1911 मध्ये केवळ दोन आकड्यांवर आली होती. या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर जुनागढच्या नवाबाने सिंहांच्या शिकारीवर बंदी घातली. जुनागढच्या नवाबांनीच 1911 मध्ये सिंहांचे संरक्षण करण्याचा पहिला उपक्रम सुरू केला होता. त्यानंतर, गुजरात सरकार आणि वन विभाग हे सिंहांची संख्या वाढवण्यासाठी सतर्क झाले आणि आज गीरमध्ये सिंहांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहेत.

AUG 10 IS CELEBRATED AS NUMBER WORLD LION DAY
'गीर' सिंहांची आशियातील सर्वात सुरक्षित भूमी

गुजरात - एक काळ होता जेव्हा आशियाई सिंह हे भारतातच नव्हे तर अरब आणि पर्शिया सारख्या परदेशातही पाहिले जात होते. परंतु, कालांतराने सिंहांची शिकार आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट केल्यामुळे आशियाई सिंह हे गुजरातेतील सौराष्ट्र परिसरात असलेल्या गीरमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात. आफ्रिकेनंतर सिंहांसाठी आशियातील सर्वात सुरक्षित भूमी म्हणून गीरकडे पाहिले जाते. आशियाई सिंह सौराष्ट्रातील 9 जिल्हे आणि 53 तालुक्यांमध्ये 30,000 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेले दिसतात.

WORLD LION DAY : 'गीर' सिंहांची आशियातील सर्वात सुरक्षित भूमी

गीरमध्ये सर्वाधिक आशियाई सिंह -

1910 आणि 1911 मध्ये आशियाई सिंहांची संख्या केवळ दोन आकड्यांवर आली होती. या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर जुनागढच्या नवाबाने सिंहांच्या शिकारीवर बंदी घातली. जुनागढच्या नवाबांनीच 1911 मध्ये सिंहांचे संरक्षण करण्याचा पहिला उपक्रम सुरू केला होता. त्यानंतर, गुजरात सरकार आणि वन विभाग हे सिंहांची संख्या वाढवण्यासाठी सतर्क झाले आणि आज गीरमध्ये सिंहांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहेत.

Gir is the safest birthplace of lions in Asia
'गीर' सिंहांची आशियातील सर्वात सुरक्षित भूमी

असा आहे सिंहांच्या संख्येचा वाढता आलेख -

गीरमध्ये सिंहांची संख्या 1911 पासून सातत्याने वाढत आहे आणि आज गीरच्या जंगलात सुमारे 674 सिंह राहत आहेत. सिंहांच्या सतत वाढीमागे वनक्षेत्राचे संवर्धन हे देखील अत्यंत महत्वाचे मानले जाते. वर्ष 1990 मध्ये 300 चौरस किमी क्षेत्राच्या जंगलात 284 सिंह दिसले तर 2020 मध्ये 674 सिंह 30,000 हजार चौरस किमी परिसरात राहत आहेत. हा प्रवास 1911 साली सुरु झाला आणि आज 2021 मध्ये खूप चांगल्या परिणामांसह पुढे जात आहे.

Gir is the safest birthplace of lions in Asia
'गीर' सिंहांची आशियातील सर्वात सुरक्षित भूमी

गीर परिसर जंगलाच्या राजासाठी सुरक्षित आणि मुक्त -

सौराष्ट्रातील 9 जिल्ह्यातील 53 तालुक्यांमध्ये आज सिंह दिसतात. याचे मोठे यश गीरमध्ये राहणाऱ्या स्थानिक मालधारींनाही जाते. सिंहांचे अन्न, पाणी आणि सुरक्षेबाबत वन विभागही चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्या काळी जुनागढमध्ये दिसणारे आशियाई सिंह आता सीमा ओलांडले गेले आहेत आणि अमरेली, भावनगर, पोरबंदर गिर सोमनाथ जिल्ह्याच्या लगतच्या भागात दिसतात. गीरमध्ये सिंहाचे सतत प्रजनन आणि सिंहांची काळजी तसेच बेकायदेशीर जंगलतोड थांबवण्यासाठी सरकार आणि वन विभागाच्या विशेष प्रयत्न केले. त्यामुळे, आज गीर परिसरातील जंगलाचा राजा सुरक्षित आणि मुक्त बनला आहे.

Gir is the safest birthplace of lions in Asia
'गीर' सिंहांची आशियातील सर्वात सुरक्षित भूमी

पर्यटकांचे आकर्षण वाढले -

1965 मध्ये, सासन सिंह सदन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुरू करण्यात आले होते. आज सुमारे सहा लाख पर्यटक या भागात प्राण्यांना मुक्तपणे फिरताना पाहण्यासाठी येतात. सिंहाच्या दर्शनाला पर्यटकांचा सकारात्मक प्रतिसाद, सिंहांबद्दल लोकांची उत्सुकता, सिंहाला जवळून पाहण्याचे, जाणून घेण्याचे पर्यटकांचे आकर्षण याबाबी लक्षात घेवून यामुळे वन विभागाने प्रयत्नांसह आज सासन व्यतिरिक्त राज्य सरकारचे देवडिया, अंबरडी आणि गिरनार निसर्ग सफारी सुरू केली आहे.

Gir is the safest birthplace of lions in Asia
'गीर' सिंहांची आशियातील सर्वात सुरक्षित जन्मभूमी

प्रत्येक पाच वर्षांनी सिंहाच्या संख्येत 25 टक्के वाढ -

सिंहांच्या प्रजननासह, सिंहांच्या मृत्यूची संख्या दरवर्षी 120 पर्यंत वाढते. यातील काही मृत्यू सिंहांच्या वृद्धत्वामुळे झाले आहेत. तर काही सिंह आजारपणामुळे मरण पावले आहेत. काही लढताना मरण पावतात तर काही दुर्दैवी सिंह अपघातात मरण पावले आहेत. गीरमध्ये दरवर्षी सुमारे 150 सिंहांचा मृत्यू होत असला तरी प्रत्येक पाच वर्षांनी सिंहाच्या संख्येत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ होत आहे. अगदी वनक्षेत्रातही सिंहाच्या अधिवासात दर पाच वर्षांनी 20% पेक्षा जास्त वाढ होत आहे. आज, आशियाई सिंहाला ग्रेटर गीर ते पोरबंदर आणि राजकोट जवळच्या चोटीला पर्यंतचा प्रवास आवडतो.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सिंहाच्या हालचालींवर बारीक नजर -

"देवलिया अंबार्डी आणि गीरनार निसर्ग सफारीकडे पर्यटक आकर्षित होतात. सासन सिंह दर्शनामध्ये अंदाजे 3 ते 4 लाख पर्यटक सिंह पाहण्यासाठी येतात. 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न वर्षाला यातून मिळते आणि सिंहाच्या हालचालींवर आणि त्यांच्या छळावर बारीक नजर ठेवण्यासाठी रेडिओ कॉलर, जीपीएस आणि सीसीटीव्हीच्या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संरक्षित केले जात आहेत, असे मुख्य वनसंरक्षक डी.टी.वसवडा यांनी ईटीव्ही भारतला सांगितले.

हेही वाचा - ETV Special Report: मेळघाट ते गुजरात व्याघ्र संचारमार्गाचे भिजत घोंगडे; 9 वर्षांपासून वनविभागात प्रस्ताव धुळखात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.