World Environment Day 2022: जागतिक पर्यावरण दिन; वाचा सविस्तर

author img

By

Published : Jun 5, 2022, 9:47 AM IST

Updated : Jun 5, 2022, 10:43 AM IST

World Environment Day 2022

यावर्षी (२०२२) मध्ये स्वीडन हा देश जागतिक पर्यावरण दिनाचा ( World Environment Day 2022 ) यजमान देश आहे. स्वीडनमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी विविध जागतिक पर्यावरण दिन जगभरात दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. पृथ्वीच्या संरक्षण, संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

नवी दिल्ली - दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकवर्षी एका विशिष्ट थीम वर पर्यावरण दिन साजरा करण्याची परंपरा यंदा 50 वर्ष पूर्ण करत आहे. 'Only One Earth' या थीमवर यावर्षी पर्यावरण दिन साजरा केला जाणार आहे.

जागतिक पर्यावरण दिन
जागतिक पर्यावरण दिन

१९७२ मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेम्ब्लीने स्टॉकहोम येथे झालेल्या परिषदेत या दिवसाची घोषणा केली होती. पर्यावरण संरक्षण या महत्त्वाच्या विषयावरील ही जगातली पहिलीच परिषद होती. ( World Environment Day 2022 ) जागतिक पर्यावरण दिन पहिल्यांदा १९७४ मध्ये साजरा झाला. हवेचे प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी समुद्रपातळी आदि विषयांवर जनजागृतीसाठी एक व्यासपीठ या दिवसाच्या निमित्ताने लाभले.

२०२२ मध्ये स्वीडन हा देश जागतिक पर्यावरण दिनाचा यजमान देश आहे. स्वीडनमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाची जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना (World Environment Day 2022 Theme) आहे 'केवळ एकच पृथ्वी' (Only One Earth). या दिवसाचे सर्व महत्त्वाचे कार्यक्रम स्वीडनमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.

ओन्ली वन अर्थ या थीममागचा विचार आहे की शांतता आणि सलोख्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जगाने एकत्र येऊन काम करणे. पर्यावरणपूरक लाइफस्टाइल (lifestyle) तयार करण्यासाठी धोरण तयार होईल. या संकल्पनेमागचा उद्देश पृथ्वीचे संवर्धन हा आहे. पृथ्वी हे आपले एकमेव घर आहे आणि ते येणाऱ्या पिढ्यांसाठी जपले पाहिजे हा या संकल्पनेमागचा हेतू आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्राधान्याने पावले उचलण्याची गरज आहे. गेली दोन वर्षे महामारीकाळात स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत पर्यावरणाचं महत्त्व कधी नव्हे इतकं लक्षात आलं आहे. जागतिक तापमानवाढ हा मानवजातीसमोरील सर्वाधिक मोठा धोका आहे. भारताने यासंदर्भात पावले उचलण्यास सुरूवात देखील केली आहे.

जागतिक पर्यावरण दिन
जागतिक पर्यावरण दिन

पर्यावरणात प्रदूषित घटकांची वाढ होत आहे, जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. म्हणूनच ज्या पृथ्वीशिवाय आणि पर्यावरणाशिवाय आपण जगू शकत नाही ते पर्यावरण निकोप राहण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, याबाबतची जागृती या दिवसाच्या निमित्ताने केली जाते. दरम्यान, 2022 हा जागतिक पर्यावरणासाठी काम करणार्‍यांकरिता एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे कारण 1972 च्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत, ज्याला पर्यावरणावरील पहिली आंतरराष्ट्रीय बैठक म्हणून मोठ्या प्रमाणावर पाहिले जाते.

जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व - पर्यावरणामुळेच आज मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचं जीवन शक्य आहे. पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा या दिनामागचा मुख्य उद्देश आहे. लोकांमध्ये पर्यावरणाप्रति जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित केला जाणारा जागतिक पर्यावरण दिवस हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे.

हेही वाचा - लवकरच पावसाच्या सरी बरसणार; हवामान विभागाचा अंदाज

Last Updated :Jun 5, 2022, 10:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.