ETV Bharat / bharat

World Deaf Day : जागतिक कर्णबधिर दिनी जाणुन घेऊया, कशी घ्यावी कानाची काळजी

author img

By

Published : Sep 23, 2022, 8:52 PM IST

कर्णबधिर (World Deaf Day) लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांविषयी सर्वसाधारण जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी जागतिक कर्णबधिर दिन साजरा केला जातो. 28 सप्टेंबर रोजी कर्णबधिर दिवस (how to take care of ears) आहे. जाणुन घेऊया, कशी घ्यावी कानाची काळजी.

World Deaf Day
जागतिक कर्णबधिर दिन

कर्णबधिर (World Deaf Day) लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांविषयी सर्वसाधारण जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी जागतिक कर्णबधिर दिन साजरा केला जातो. 28 सप्टेंबर रोजी कर्णबधिर दिवस (how to take care of ears) आहे. जाणुन घेऊया, कशी घ्यावी कानाची काळजी.

जागतिक कर्णबधिर दिनाची वैशिष्टये : जागतिक कर्णबधिर दिन साजरा करण्यासाठी खालील महत्त्वाची उद्दीष्टे आहेत –

जगभरातील कर्णबधिर लोकांच्या समस्यांविषयी सामान्य लोकांना माहिती करून देणे.

कर्णबधिर लोकांना आवश्यक म्हणून सांकेतिक भाषा शिकण्यास प्रोत्साहन देणे.

कर्णबधिर लोकांच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक संसाधने उपलब्ध करुन देणे.

कर्णबधिरतेचा संभाव्य धोका कोणास होऊ शकतो : 50 वर्षापेक्षा जास्त वयाचे वयस्क किंवा गोंगाटाच्या ठिकाणी काम करणारे अश्या लोकांना, कानाच्या समस्या होण्याचा धोका जास्त असतो. बहिरेपणाचे लवकर निदान होण्यासाठी आवश्यक सेवा आरोग्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करुन देण्यात याव्या.

बहीरेपणाची कारणे : कानात संसर्ग.

वृद्धत्व

अनुवांशिकता

कानाचे रोग

दीर्घकाळ मोठ्या आवाजात राहणे

अपघात

कानाची काळजी कशी घ्यावी :

कानात धारदार वस्तू घालणे टाळा.

गोंगाटाच्या ठिकाणी जाणे टाळा.

ध्वनी प्रदूषण टाळा.

टीव्ही, स्टीरिओ कमी आवाजात ऐका.

डॉक्टरांनी सांगितल्याखेरीज कानात तेल किंवा कोणत्याही प्रकारचे द्रव टाकू नका.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.