ETV Bharat / bharat

Womens Asia Cup 2022, INDW vs PAKW : निदा दारच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर, पाकिस्तानने 13 धावांनी भारताला चारली धूळ

author img

By

Published : Oct 7, 2022, 4:51 PM IST

INDW vs PAKW
INDW vs PAKW

या सामन्यात पाकिस्ताने निदा दारच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताचा 13 धावांनी पराभव ( Pakistan beat india by 13 runs ) केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारताला 138 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संघ 19.4 षटकांत 124 धावांवर गडगडला.

सिल्हेट: शुक्रवारी सिल्हेट येथे महिला आशिया चषक ( Womens Asia Cup 2022 ) स्पर्धेचा तेरावा सामना भारत आणि पाकिस्तान संघात ( INDW vs PAKW ) पार पडला. या सामन्यात पाकिस्ताने निदा दारच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताचा 13 धावांनी पराभव ( Pakistan beat india by 13 runs ) केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारताला 138 धावांचे लक्ष्य दिले होतो. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संघ 19.4 षटकांत 124 धावांवर गडगडला.

भारताच्या डावाची खराब सुरुवात -

138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने अवघ्या 23 धावांच्या स्कोअरवर भारताची पहिली विकेट पडली. 15 धावांवर नशरा संधूच्या गोलंदाजीवर ( Bowler Nashra Sandhu ) सभिनेनी मेघनाला अमीनकरवी झेलबाद झाली. फलंदाज जेमिमा दुसऱ्या विकेटच्या रुपाने 2 धावा काढून बाद झाली. तिला निदा दारने बाद केले. तसेच स्मृती मंधानाच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. तिला 17 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर नशरा संधूने बाद केले. पूजा चौथ्या विकेटच्या रुपाने पूजा धावबाद झाली, तर लवकरच भारताला पाचवा धक्का बसला. दयालेन हमलाता 20 धावा करून बाद झाली. तिला तुबा हसनने क्लीन बोल्ड केले.

निदा दारचे शानदार अर्धशतक -

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निदा दारच्या अर्धशतकी (Allrounder Nida Dar ) खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 6 गडी गमावून 137 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला 138 धावांचे लक्ष्य मिळाले. पाकिस्तानकडून निदा दारने 56 धावांची नाबाद ( Nida Dar half century )खेळी खेळली. तत्पूर्वी, बिस्माहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.पाकिस्तान संघाची पहिली विकेट अमीनच्या रूपाने पडली, जी पूजा वस्त्राकरवी झेलबाद झाली.

सिद्रा अमीनचा झेल रिचा घोषने टिपला. पाकिस्तानची दुसरी विकेट मुनीबा अलीच्या रूपात पडली, तिला दीप्ती शर्माने 17 धावांवर बाद केले, तर ओमामा सोहेललाही दीप्ती शर्माने शून्यावर बाद केले. भारताकडून पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या डावात दिप्ती शर्माने 3 बळी घेतले, तर पूजा वस्त्राकरने दोन, तर रेनुका सिंगने एक विकेट घेण्यात यश मिळवले.

हेही वाचा - Ravi Shastri Statement : बुमराह आणि जडेजा टी 20 संघात नसताना रवी शास्त्रींने केले मोठे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.