ETV Bharat / bharat

Wife knife Attack On Husband : लपाछपीचा डाव, पत्नीचा पतीवर चाकूचा घाव

author img

By

Published : Apr 19, 2022, 9:44 AM IST

आंध्र प्रेदेशमधील अंकपल्ली जिल्ह्यातील बुचायापेटा येथे एक खळबळजणक घटना समोर आली आहे. लग्न ठरलेले होते. थोड्याच दिवसांत ते लग्न होणार होते. ( Wife knife Attack On Husband ) त्याअगोदरच होणाऱ्या पत्निने होणाऱ्या पतिवर लपाछपीचा डाव खेळताना चाकूने प्राणघात हल्ला केला आहे.

पत्नीचा पतीवर चाकू हल्ला
पत्नीचा पतीवर चाकू हल्ला

मुंबई - लपाछपी खेळत असताना आपल्याला समोरचे काही दिसत नाही असा बहाना करून पत्नीने पतीवर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आंध्र प्रेदेशमधील अंकपल्ली जिल्ह्यातील बुचायापेटा येथे घडली आहे. ( Wife knife Attack On Husband In Andhra ) रामनायडू आणि रविकाथम येथील विय्यापू पुष्पा यांचा विवाह ठरला होता. (दि. 20 मे)रोजी ते विवाहबद्द होणार होते. हे दोघे समोवारी (दि. 18 एप्रिल)रोजी वड्डाडी येथे खरेदीसाठी गेले होते. त्यानंतर वापस येताना ही घटना घडली.

गंभीर जखमी - रामनायडू आणि रविकाथम येथील विय्यापू पुष्पा यांचा विवाह ठरला होता. त्यानंतर काही लग्नाचे खरीदी करण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर वापस येताना ते कोमल्लापुडी उपनगरातील बाबा आश्रमात ते गेले. तेथे गेल्यानंतर ते दोघे डोळ्यावर पट्टी बांधून लपाछपीचा खेळ खेळत होते. दरम्यान, समोर काही दिसत नसल्याचा बहाणा करत त्या तरुणीने होणाऱ्या पतीवर चाकूने हल्ला केला. त्यामध्ये त्याच्या गळ्यावर चाकूचे गंभीर वार झाले. ज्यामध्ये त्याचे मोठ्या प्रमाणता रक्त वाहत होते.

आपल्याशी लग्न करणे तीला आवडत नव्हते - या घटनेनंतर त्याच तरुणीने त्याला स्वतःच्या दुचाकीवरून रविकमठम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला तातडीने अनकपल्ली खासगी रुग्णालयात दाखल केले. ही घटना कोमल्लापुडी अनकापल्ली जिल्ह्यात घडली. आपल्याशी लग्न करणे तीला आवडत नसल्याने आपल्यावर हा हल्ला करण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया या तरूणाने दिली आहे.

हेही वाचा - कर्नाटकने नुकसान भरपाईसाठी भरुन जप्त केलेली बस वापस नेली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.