Presidential Election 2022 : पवारांचा नकार.. राष्ट्रपती पदासाठी विरोधकांचा उमेदवार कोण? 'या' दोन नावांचीच चर्चा

author img

By

Published : Jun 16, 2022, 9:20 AM IST

Presidential Election 2022 Opposition Candedate
राष्ट्रपती पदासाठी विरोधकांचा उमेदवार कोण ()

आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी बैठकीत ( Opposition Meet On Presidential Election ) शरद पवारांचे ( NCP Chief Sharad Pawar ) नाव सुचवले होते. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर आता विरोधकांचा उमेदवार कोण? याची चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांकडून आता फारूक अब्दुल्ला आणि गोपाळ कृष्ण गांधी या दोघांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी महात्मा गांधी यांचे नातू, माजी मुत्सद्दी गोपाळ कृष्ण गांधी ( Gopal Krishna Gandhi ) आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ( Farooq Abdullah ) यांची नावे विरोधकांच्यावतीने समोर आली आहेत. याआधी विरोधी पक्षांनी शरद पवारांना ( NCP Chief Sharad Pawar ) निवडणूक लढवण्याची विनंती केली. मात्र त्यांनी नकार दिला. त्यामुळे आता विरोधकांचा उमेदवार कोण? हे पाहणे महत्त्वाचे आहे. संयुक्त उमेदवाराचा निर्णय घेण्यासाठी येथे 18 विरोधी पक्षांच्या पहिल्या बैठकीत बुधवारी चर्चा ( Opposition Meet On Presidential Election ) झाली.

ममतांनी सुचवले नाव : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) यांनी बैठकीत ही दोन नावे सुचवली होती. पवार यांनी आणखी काही वर्षे सक्रीय राजकारणात राहणे पसंत केले, असे या बैठकीत उपस्थित सूत्रांनी सांगितले. सर्व पक्षांनी पवारांना त्यांच्या निर्णयाचा “पुनर्विचार” करण्यास सांगून बैठक संपवली. त्यानंतर आता या दोन नावांवर विचार करण्याचा किंवा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला होणाऱ्या चर्चेच्या पुढच्या फेरीत कोणताही एक उमेदवार निवडण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला 18 पक्षांचे नेते - या बैठकीस माजी पंतप्रधान देवगौडा, ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), मल्लिकार्जून खरगे (काँग्रेस), अखिलेश यादव (उत्तर प्रदेश), मेहबुबा मुफ्ती (काश्मीर), सुभाष देसाई (महाराष्ट्र), ई करीम (केरळ), जयराम रमेश (काँग्रेस), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस), टी. आर. बालू (तामिळनाडू), यशवंत सिन्हा (बिहार), रणदीप सुरजेवाला (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), उमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), राजा (तामिळनाडू) आदी १८ नेते उपस्थित होते. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरविण्यासाठी नवी दिल्ली येथे आज पार पडलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भूषविले.

भाजपावर विरोधकांचे टिकास्त्र - भाजपने घटनेची चौकट मोडण्यास सुरुवात केली आहे. देशाने ७५ वर्षांत जपलेली मूल्ये पायदळी तुडवली आहेत. संविधानिक यंत्रणांचा गैरवापर चालवला आहे. अशावेळी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपतीपदासाठी एकमुखाने उमेदवार ठरवावा व निवडून आणावा. अशी चर्चा यावेळी झाली. भाजपा विरोधातील पक्षांना एकत्र आणण्याची सुरुवात महाराष्ट्राने केली. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी ही सुरुवात केली. केवळ राष्ट्रपती निवडीसाठी नव्हे तर सर्व विरोधी पक्षांनी एकजूट मजबूत केली पाहीजे. शरद पवार यांनी ही निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यांचा नकार कायम राहिल्यास सर्वसामान्य, उज्वल प्रतिमेचा शक्य झाल्यास राजकीय परिघाबाहेरचा उमेदवार निवडावा, हे देशासाठी प्रतिष्ठेचे पद आहे. म्हणून ही निवडणूक महत्वाची असल्याची भूमिका शिवसेना नेते तसेच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केली.

विरोधी राज्यातील मुख्यमंत्र्यांची ऑगस्ट महिन्यात परिषद - यावेळी सर्व विरोधी पक्षाच्यावतीने संयुक्त निवेदन सादर करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील आठ वर्षांपासून लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत आहे. नागरिकांना दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. राज्यघटनेची चौकट मोडण्याची वारंवार प्रयत्न होत आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात वाईट सरकार असल्याची भावना यावेळी विरोध गटांतील नेत्यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात हे सरकार अपयशी ठरले. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील दरी वाढत चालली आहे, असे यापूर्वी कधीही घडले नाही. राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी राज्यपाल कार्यालयांचा वापर केला जात आहे. याला विरोध दर्शविण्यासाठी सर्व विरोधी राज्यातील मुख्यमंत्र्यांची ऑगस्ट महिन्यात परिषद घेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : Kedarnath Disaster : केदारनाथ प्रलय : हजारो लोकांना वाहून घेऊन गेली होती मंदाकिनी नदी.. 'अशी' झाली होती दुर्घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.