ETV Bharat / bharat

Dhantrayodashi : काय आहे धनत्रयोदशीचे महत्व, कथा, पूजेची पध्दत आणि शुभ मुहूर्त; जाणुन घेऊया

author img

By

Published : Sep 25, 2022, 6:14 PM IST

Updated : Oct 22, 2022, 12:59 PM IST

धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व (What is significance of Dhantrayodashi or Dhanteras) विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यत: धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते.Dhantrayodashi.

Diwali 2022
धनत्रयोदशीचे महत्व

Dhantrayodashi: कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीमुळे 'धनत्रयोदशीचा सण' साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी या दिवशी समुद्रमंथनात अवतरले होते. म्हणूनच त्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर अकाली मृत्यू टाळण्यासाठी दक्षिण दिशेला किंवा घराच्या मुख्य दरवाजावर यमराजासाठी पिठाचा दिवा ठेवावा. त्यामुळे यमराज प्रसन्न होतात. धनत्रयोदशीला खरेदीसोबतच भगवान धन्वंतरीचीही पूजा केली जाते. पूजेच्या पूर्ण पद्धतीसह खरेदी आणि पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त (What is significance of Dhantrayodashi or Dhanteras) जाणून घ्या.Diwali 2022.

धनत्रयोदशी कथा : धनत्रयोदशी (What is the story of Dhantrayodashi) या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात

यम यमलोकात परततो: या कारणास्तव यम आपल्या जगात यमलोकात परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास 'यमदीपदान' असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास 'धन्वंतरी जयंती' असेही म्हणतात.

धनत्रयोदशीचे महत्त्व : धनत्रयोदशीला (What is significance of Dhantrayodashi Dhanteras) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन, सुख आणि समृद्धी येते. यासोबतच संपत्तीचा देव कुबेर यांचीही पूजा या दिवशी केली जाते. हिंदू मान्यतेनुसार, भगवान विष्णूचा अवतार भगवान धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला होता. त्याची पूजाही केली जाते.

धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त आणि तिथी : धनत्रयोदशीची (Auspicious time and date of Dhantrayodashi) सुरुवात 22 ऑक्टोबर रोजी शनिवारी संध्याकाळी 06:02 वाजता होईल आणि 23 ऑक्टोबर रोजी रविवारी संध्याकाळी 06.03 वाजता संपेल. धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त 21 मिनिटांचा असेल. 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 05:44 ते 06:05 पर्यंत असेल. प्रदोष कालाची वेळ 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:44 ते रात्री 8:16 पर्यंत आणि वृषभ कालची वेळ 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.58 ते 8:54 पर्यंत असेल.

धनत्रयोदशीची पूजा पद्धत : (What is the method of worship of Dhantrayodashi) सर्व प्रथम, आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. भगवान धन्वंतरीची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ ठिकाणी स्थापित करा आणि पूर्व दिशेला तोंड करून बसा. त्यानंतर या मंत्राने भगवान धन्वंतरीचे आवाहन करावे. 'सत्यं च येन निरतं रोगं विधूतं, 'अन्वेषित च सविधिं आरोग्यमस्य।' आणि 'गूढं निगूढं औषध्यरूपम्, धन्वन्तरिं च सततं प्रणमामि नित्यं।।' या मंत्राचा जप करावा.यानंतर पूजास्थळी आसन देण्याच्या भावनेने तांदूळ अर्पण करा. आचमनसाठी पाणी सोडा आणि भगवान धन्वंतरीला वस्त्र (माउली) अर्पण करा. भगवान धन्वंतरीच्या मूर्तीवर किंवा चित्रावर अबीर, गुलाल पुष्पा, रोळी आणि इतर सुगंधी वस्तू अर्पण करा. चांदीच्या भांड्यात खीर अर्पण करा. (चांदीची भांडी नसल्यास, इतर कोणत्याही भांड्यातही भोग देऊ शकता.) त्यानंतर आचमनसाठी पाणी सोडावे. मुखशुद्धीसाठी सुपारी, लवंग, सुपारी अर्पण करा. भगवान धन्वंतरीला शंखपुष्पी, तुळशी, ब्राह्मी इत्यादी पूजनीय औषधी अर्पण करा. यानंतर रोगाच्या नाशासाठी या मंत्राचा जप करावा. मंत्र - 'ओम रम रुद्र रोग नाशय धन्वंतरे वसा ।' त्यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ आणि दक्षिणा अर्पण करा. पूजेच्या शेवटी कर्पूर आरती करावी. Diwali 2022.

Last Updated : Oct 22, 2022, 12:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.