ETV Bharat / bharat

Virat Anushka Purchased Land : विराट-अनुष्काने अलिबागमध्ये खरेदी केली 8 एकर जमिन, जाणून घ्या किंमत

author img

By

Published : Sep 2, 2022, 3:43 PM IST

Updated : Sep 2, 2022, 5:03 PM IST

अनुष्का शर्मा ( Anushka Sharma ) आणि विराट कोहली ( Virat Kohli ) एका नवीन मालमत्तेचे मालक बनले आहेत. दोघेही अलिबागमध्ये एक भव्य फार्महाऊस बांधणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी दोघांनी 8 एकर जमीन खरेदी ( Virat Anushka Purchased 8 acres Land ) केली आहे. ज्याची किंमतही करोडोंमध्ये आहे.

virat kohli
विराट कोहली

मुंबई: अनुष्का शर्मा ( Actress Anushka Sharma ) आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली ( Cricketer Virat Kohli ) हे बॉलिवूड आणि क्रिकेट इंडस्ट्रीतील सर्वात आवडते जोडपे आहेत. दोघांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये लग्न केले होते. आता ते वामिका नावाच्या मुलीचे पालक आहेत. दोघेही अनेकदा चाहत्यांमध्ये कपल गोल सेट करत आहेत. दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एका नव्या मालमत्तेचे मालक बनल्याची चर्चा आहे. दोघेही अलिबागमध्ये एक भव्य फार्महाऊस बांधणार ( Virat Kohli will build farmhouse in Alibaug )असल्याची चर्चा आहे. त्यासाठी दोघांनी 8 एकर जमीन खरेदी केली ( Virat Anushka Purchased 8 acres Land )आहे.

ETimes च्या रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या जमिनीवर फार्महाऊस बांधणार आहेत. त्याचबरोबर या फार्महाऊसची किंमत 19 कोटींच्या ( Virat's farmhouse is worth 19 crores ) आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. विराट आणि अनुष्का 6 महिन्यांपूर्वी ही जमीन पाहायला गेले होते. परंतु, वेळेअभावी या जमिनीचा व्यवहार 30 ऑगस्टला होऊ शकला. वृत्तानुसार जमिनीचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.

कारण, विराट कोहली सध्या आशिया कपमुळे दुबईत असून, त्याच्या अनुपस्थितीत त्याचा धाकटा भाऊ विकास कोहलीने ( Virat younger brother Vikas Kohli ) जमिनीच्या व्यवहाराची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी 1 कोटी 15 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरून जमिनीची नोंदणी करून घेतली आहे. समीरा हॅबिटॅट्स नावाच्या सुप्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनीच्या ( Samira Habitats Real Estate Company ) माध्यमातून हा करार करण्यात आला आहे.

विराट व्यतिरिक्त इतर खेळाडू देखील आहेत उत्सुक

मंगळवारी विराटचा भाऊ विकास कोहली याने गणपतीच्या एक दिवस आधी जमिनीशी संबंधित व्यवहार पूर्ण ( Vikas Kohli handled the land affairs ) केला. विराट आणि अनुष्काने खरेदी केलेल्या या जमिनीची एकूण किंमत 19 कोटी 24 लाख 50 हजार रुपये आहे. ज्यासाठी अनुष्का-विराटने 3 लाख 35 हजार रुपये मुद्रांक शुल्कही जमा केले आहे. यापूर्वी क्रिकेट उद्योगातील दिग्गज रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांनीही याच भागात फार्महाऊस खरेदी केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल देखील या भागात घर बांधण्यासाठी इच्छुक आहेत.

हेही वाचा - Hbd Ishant Sharma : कधी नायक तर कधी खलनायक..! इशांतच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या रोलर कोस्टर क्रिकेट लाइफवर टाकूया एक नजर

Last Updated : Sep 2, 2022, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.