ETV Bharat / bharat

भारत बायोटेककडून 4 अब्ज कोव्हिड लशीचे जगभरात वाटप - व्यकंय्या नायडु

author img

By

Published : Jul 30, 2021, 10:28 PM IST

भारत बायोटेकचे व्यकंय्या नायडुंकडून कौतुक
भारत बायोटेकचे व्यकंय्या नायडुंकडून कौतुक

उपराष्ट्रपती म्हणाले, की भारत बायोटेकने 4 अब्ज कोव्हिड लशीचे जगभरात आजवर वाटप केले आहे. विविध देशांमधील लोकांचे प्राण वाचविणाऱ्या वैज्ञानिकांचे त्यांनी कौतुक केले. हैदराबाद हे मोठ्या प्रमाणात औषधे आणि लशीचे उत्पादन करणारे केंद्र आहे.

हैदराबाद - उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी हैदराबाद शहरामधील जीनोम व्हॅलीमधील भारत बायोटकच्या उत्पादन केंद्राला बेट दिली. यावेळी तेलंगानाचे गृहमंत्री मोहम्मद महमुद अलीदेखील उपस्थित होते. नायडू यांनी कोव्हॅक्सिन उत्पादन प्रक्रियेला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या भारत बायोटेक आणि शास्त्रज्ञांचे कौतुक केले.

उपराष्ट्रपती म्हणाले, की भारत बायोटेकने 4 अब्ज कोव्हिड लशीचे जगभरात आजवर वाटप केले आहे. विविध देशांमधील लोकांचे प्राण वाचविणाऱ्या वैज्ञानिकांचे त्यांनी कौतुक केले. हैदराबाद हे मोठ्या प्रमाणात औषधे आणि लशीचे उत्पादन करणारे केंद्र आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी 40 टक्के औषधांचे हैदराबादमध्ये उत्पादन होते.

व्यकंय्या नायडुंकडून भारत बायोटेकचे कौतुक

हेही वाचा-कोव्हिड 19 संसर्गजन्यसारखे रोग प्राणघातक असल्याचे पुरावे आढळले नाहीत- मनसुख मांडवीय

हैदराबाद शहर हे देशाच्या औषधांच्या निर्यातीत 50 टक्के योगदान देते. जिनोम व्हॅली हे जैवतंत्रज्ञानात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे हैदराबाद शहर हे देशात उच्च पातळीवर पोहोचले आहे. आयसीएमआर आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या सहकार्याने कोव्हॅक्सिनचे उत्पादन केल्याबद्दल व्यंकय्या नायडू यांनी भारत बायोटेकचे अभिनंदन केले.

व्यंकय्या नायडू यांची कोव्हॅक्सिन उत्पादन प्रकल्पाला भेट
व्यंकय्या नायडू यांची कोव्हॅक्सिन उत्पादन प्रकल्पाला भेट

हेही वाचा-VIDEO, चक्क पाण्यात तरंगू लागले सिलिंडर, हरियाणातील पुराचा व्हिडिओ व्हायरल

कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असताना आपण आत्मसंतुष्ट राहू नये. हा केवळ उसासा टाकण्याच्या वेळेसारखे आहे. आपण एकत्रितपणे आरोग्याच्या आव्हानांना मोठ्या आत्मविश्वास आणि बांधिलकीने सामोरे जाणे गरजेचे आहे. देशभरात वेगवान पद्धतीने शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. सतत बदलणाऱ्या विषाणुमुळे कधी नव्हे तेवढी आव्हाने निर्माण झाली आहे. त्यामुळे वैज्ञानिकांना उत्तरे शोधण्यास भाग पडले आहे. जेणेकरून लोकांचे जीवन आणि उदरनिर्वाह वाचू शकणार आहे.

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, कंपनीचे संचालक व तेलंगाणाचे गृहमंत्री
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, कंपनीचे संचालक व तेलंगाणाचे गृहमंत्री
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.