ETV Bharat / bharat

Samana Editorial On Varun Gandhi : वरुण गांधी हे तुमच्याच पक्षाचे आहेत! सामनातून भाजपवर हल्ला

author img

By

Published : Dec 24, 2021, 11:08 AM IST

Updated : Dec 24, 2021, 11:25 AM IST

मागील 70 वर्षांत देशाने जे कमावले ते सगळे 'मोडीत'च काढायचे, असे 'मोदी' सरकारने ठरवलेले दिसत आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांनी (Samana Editorial On Varun Gandhi) खासगीकरणाच्या नावावर सगळेच विकले जात आहे, अशा शब्दांत मोदी सरकारवर टीका केली आहे. (Gandhi Criticism of BJP from above) राहुल गांधी किंवा इतरांकडे तुम्ही दुर्लक्ष करता हे ठीक, पण वरुण गांधी हे तुमच्याच पक्षाचे आहेत. त्यांनीही तेच प्रश्न उपस्थित केले आहेत. तेव्हा आता तरी मौन सोडा. कारण तुम्ही कितीही झाकायचा प्रयत्न केलात तरी खासगीकरणाचा 'कोंबडा' रोज आरवतोच आहे, हे तरी लक्षात घ्या असे म्हणत आजच्या सामनातून भाजपवर हल्ला चढवला आहे.

खासदार वरून गांधी
खासदार वरून गांधी

मुंबई - केंद्र सरकारने विविध सरकारी उपक्रम आणि बँकांच्या खासगीकरणाचा धडाकाच लावला आहे. त्यावरून विरोधकांसह सर्वच पातळ्यांवर टीका होत असली तरी केंद्रातील सत्ताधारी त्यावर सोयिस्कर मौन बाळगून आहेत. (Samana Editorial On Varun Gandhi) बोलायचेही नाही आणि जे करायचे आहे ते सोडायचेदेखील नाही, (Gandhi Criticism of BJP from above) असेच एकंदरीत केंद्र सरकारचे (BJP MP Varun Gandhi Slams Govt Bank Privatisation) खासगीकरणाबाबतचे धोरण आहे. मात्र, आता भाजपचेच एक खासदार वरुण गांधी यांनीही त्यावरूनच स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे. सरकारचे खासगीकरणाचे आणि ई-कॉमर्सचे धोरण देशविरोधी असून खासगीकरणामुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार धोक्यात आले आहेत, असे वरुण गांधी म्हणाले.

अर्थव्यवस्थादेखील धोक्यात आली

उत्तर प्रदेशमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्राच्या धोरणावर सडकून टीका केली. 'केंद्र सरकार खासगीकरणाच्या नावावर सगळेच विकून टाकत आहे. त्यामुळे कोट्यवधींच्या रोजगारावर तर गदा आलीच आहे. परंतु, अर्थव्यवस्थादेखील धोक्यात आली आहे,' असे वरुण गांधी म्हणाले. (Govt Bank Privatisation सरकारी नोकऱ्या देण्याऐवजी आहेत त्या काढून घेण्याचे उफराटे धोरण सध्या राबविले जात आहे, असेही ते म्हणाले. वरुण गांधी हे नेहरू-गांधी परिवारातील असले तरी ते भाजपचे खासदार आहेत. त्यांच्या आई मनेका गांधी यादेखील बरीच वर्षे भाजपच्याच खासदार राहिल्या आहेत. मोदी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषविले आहे. त्यामुळे वरुण गांधी यांची टीका त्यांच्या पक्षधुरिणांना झोंबणारी नक्कीच आहे.

निराकरण करण्याऐवजी त्यांना राष्ट्रद्रोही, पक्षद्रोही म्हणत दुर्लक्ष करायचे

राहुल गांधी यांची टीका 'राजकीय' वगैरे असल्याची बतावणी भाजपवाले नेहमीच करीत असतात. मग आता त्यांच्याच पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी केलेल्या टीकेबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे? अर्थात, त्यावरही वरुण गांधी सध्या 'नाराज' वगैरे आहेत. त्या वैफल्यातून ते स्वपक्ष आणि सरकारवर टीका करीत आहेत, अशी मखलाशी भाजपची मंडळी करतील. मागील काही दिवसांतील बातम्यांवरून चित्र जरी तसे दिसत असले तरी वरुण गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे, मुद्द्यांचे काय? पक्षाचे धोरण म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे काही ठरले असेल तर तो भाजपचा पक्षांतर्गत मामला आहे. त्यावर कोणी काही टिकाटिप्पणी करण्याचे कारण नाही.

सोयिस्कर मौन बाळगायचे असे धोरण सध्या केंद्रातील सरकारचे आहे

वरुण गांधी काय किंवा इतर काय, त्यांनी वस्तुस्थितीला धरून केलेल्या टीकेवर तरी काही टिप्पणी कराल की नाही? केंद्राच्या खासगीकरणाच्या धोरणावरून उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकार म्हणून तुम्ही जनतेला द्यायलाच हवीत. कारण सामान्य जनतेच्याही मनात सरकारी कंपन्यांच्या या 'बंपर सेल'बाबत हेच प्रश्न आहेत. विरोधक काय किंवा सुब्रमण्यम स्वामी, वरुण गांधी यांच्यासारखे भाजपचे 'स्वपक्षीय निंदक' काय, हे जनतेच्या मनातील खदखदच चव्हाट्यावर मांडत असतात. परंतु त्यांचे निराकरण करण्याऐवजी त्यांना राष्ट्रद्रोही, पक्षद्रोही म्हणत दुर्लक्ष करायचे. सोयिस्कर मौन बाळगायचे असे धोरण सध्या केंद्रातील सरकारचे आहे.

खासगीकरणाचा 'कोंबडा' रोज आरवतोच आहे

निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी सरकारी तिजोरीत भरायचे असे म्हणे केंद्र सरकारचे 'लक्ष्य' आहे. सरकारी तिजोरी भरण्याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी सामान्य जनतेच्या खिशांना का कात्री लावीत आहात? त्यांच्या रोजगारावर का गदा आणीत आहात? मागील 70 वर्षांत देशाने जे कमावले ते सगळे 'मोडीत'च काढायचे, असे 'मोदी' सरकारने ठरविलेले दिसत आहे. 'या सर्व पायाभूत सुविधा म्हणजे देशाचा हिरेजडित मुकुट आहे आणि तो मोदी सरकारने विकायला काढला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मध्यंतरी केली होती.

वरुण गांधी हे तुमच्याच पक्षाचे आहेत

आता खासदार वरुण गांधी यांनीही त्याच मुद्यावर बोट ठेवले आहे. खासगीकरणाच्या नावावर सगळेच विकले जात आहे, अशा शब्दांत वरुण गांधी मोदी सरकारवर बरसले आहेत. राहुल गांधी किंवा इतरांकडे तुम्ही दुर्लक्ष करता हे ठीक, पण वरुण गांधी हे तुमच्याच पक्षाचे आहेत. त्यांनीही तेच प्रश्न उपस्थित केले आहेत. तेव्हा आता तरी मौन सोडा. कारण तुम्ही कितीही झाकायचा प्रयत्न केलात तरी खासगीकरणाचा 'कोंबडा' रोज आरवतोच आहे, हे तरी लक्षात घ्या असा टोलाही आजच्या सामनातून लगावला आहे.

हेही वाचा - यूपी विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाची पंतप्रधान आणि निवडणूक आयुक्तांना विनंती

Last Updated :Dec 24, 2021, 11:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.