ETV Bharat / bharat

महाराष्ट्रासह 10 राज्यांमधील पॉझिटिव्हिटीचा दर मागील आठवड्यांच्या तुलनेत जास्त -राजेश भुषण

author img

By

Published : Jul 31, 2021, 9:03 PM IST

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण म्हणाले, की या परिस्थितीत निष्काळजीपणा केला तर काही राज्यांमधील परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोरम, मेघालय, आंध्रप्रदेश आणि मणिपूरचा समावेश आहे.

राजेश भुषण
राजेश भुषण

नवी दिल्ली - देशातील 10 राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण आणि पॉझिटिव्हिटीचा दर वाढत आहे. याबाबतच्या स्थितीचा आढावा आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण यांनी शनिवारी घेतला आहे. 10 राज्यांमधील पॉझिटिव्हिटीचा दर हा मागील आठवड्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे कठोर निर्बंध, लोकांचा प्रवास, गर्दी यावर नियंत्रण आणण्याची गरज आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण म्हणाले, की या परिस्थितीत निष्काळजीपणा केला तर काही राज्यांमधील परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोरम, मेघालय, आंध्रप्रदेश आणि मणिपूरचा समावेश आहे. या सहा राज्यांमध्ये देशातील 80 टक्क्यांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. गृहविलगीकरणातील लोकांवर परिणामकारतेने देखरेख करण्याची गरज आहे. जेणेकरून त्यांना वेळेवर रुग्णालयात उपचार मिळणे शक्य आहे. यापूर्वीच कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची एसओपी रुग्णालयांना दिल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिवांनी दिली.

हेही वाचा-आयईडीच्या प्रकरणात एनआयए सक्रिय; जम्मू काश्मीरमध्ये 15 ठिकाणी टाकले छापे

आयसीएमआरने हा दिल्ला सल्ला-

आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव म्हणाले, की देशातील 46 जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिची जास्त आहे. तर इतर 53 जिल्ह्यांमध्ये 5 ते 10 टक्के पॉझिटिव्हिटीचे प्रमाण आहे. राज्यांना टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे, अशी विनंतीर भार्गव यांनी केली. राज्यांनी त्यांच्या पातळीवर व जिल्हापातळीवर सिरो सर्वेक्षण करावेत, असे त्यांनी आवाहन केले. राज्यांनी 60 हून अधिक तसेच 45 ते 60 वर्षे वयोगटामध्ये लसीकरण वाढवावे, असा सल्ला आयसीएमआरच्या संचालकांनी दिला. कारण, या वयोगटात मृत्यूचे प्रमाण 80 टक्के आढळल्याचे त्यांनी सांगितले. अनावश्यक वाहतूक आणि लोकांची गर्दी टाळण्यासाठी राज्यांनी उपाययोजना कराव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला. ज्या भागांमध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण आहे, त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रसारख्या उपाययोजना कराव्यात.

हेही वाचा-सीमावाद : मिझोरम पोलिसांकडून आसाम मुख्यमंत्र्यांसह 6 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.