ETV Bharat / bharat

चीनमधील 'गूढ' आजारानंतर केंद्र सरकार अलर्टवर, वाचा तज्ज्ञांचं मत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 5:43 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Pneumonia Outbreak : कोरोनानंतर आता पुन्हा एका नव्या आजाराबाबत शंका वाढत आहेत. यावेळीही या आजाराची सुरुवात चीनमधूनच झाली. हा आजार न्यूमोनियासारखा आहे. मात्र, या नव्या आजाराचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. वाचा पूर्ण बातमी..

नवी दिल्ली Pneumonia Outbreak : आधी कोरोना आणि आता आणखी एक तसाच आजार. चीनमधील या 'गूढ' आजाराबाबत भारत सतर्क झाला आहे. केंद्र सरकारनं राज्यांना रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचा सल्ला दिलाय. हा आजार 'न्यूमोनिया' सारखा असल्याचं बोललं जातंय. कोविडच्या काळात ज्या प्रकारे अराजकता निर्माण झाली होती, तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे आधीच सावध पावलं उचलली जातायेत.

आरोग्य सुविधांचा आढावा घेण्याचे निर्देश : सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना सल्ला देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, तुम्ही तुमच्या ठिकाणाच्या आरोग्य सुविधांचा आढावा घ्या आणि कोविडच्या संदर्भात जी काही देखरेख समिती स्थापन केली गेली, त्याच्या ऑपरेशनची तयारी करा. सरकारनं जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये नवीन आजार श्वसनाशी संबंधित असल्याचं म्हटलं आहे. श्वसनाचे आजार प्रामुख्याने SARS-CoV2, मायकोप्लाझ्मा आणि इन्फ्लूएंझा मुळे होतात.

  • Union Health Ministry decides to proactively review preparedness measures against respiratory illnesses in view of emerging public health situation in China. Advises States/UTs to immediately review public health and hospital preparedness measures. All States/UTs to implement… pic.twitter.com/Q6RNymrmfS

    — ANI (@ANI) November 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोणता आजार आहे : चीनमध्ये ज्या रोगाचा प्रसार वाढतोय, त्याबद्दल अद्याप जास्त माहिती देण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सच्या आधारे म्हटलं जातंय की, हा आजार मुलांच्या श्वसन प्रणालीवर हल्ला करू शकतो. ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये H9N2 विषाणूची पुष्टी झाली होती. हा विषाणू प्रामुख्यानं एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलंय की, हा आजार माणसाकडून माणसांमध्ये फार वेगानं पसरत नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, यामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी आहे. मात्र हा रोग प्राण्यांमध्ये पसरू शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात : आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ आरव्ही अशोकन 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, "हा मुख्यतः एव्हियन फ्लू आहे. त्याचा पक्ष्यांवर परिणाम होतो. मात्र कधी कधी माणसांनाही याचा फटका बसू शकतो. हे आमच्यासाठी चिंतेचं कारण नाही, कारण हा इन्फ्लूएंझा विषाणूचा एक वेगळा प्रकार आहे. आपल्याकडे वर्षभर इन्फ्लूएंझा काही ना काही प्रकारे येतो. त्यामुळे भारताला यातून कोणताही धोका दिसत नाही. काही वेळा तो एका विशिष्ट भागात पसरू शकतो. तेथे विशेष दक्षता ठेवावी लागेल. याशिवाय, भारतात विविध प्रकारचे लसीकरण कार्यक्रम आहेत, जे आपली प्रतिकारशक्ती टिकवून ठेवतात".

आजाराची लक्षणं :

  1. फ्लू सारखी लक्षणं दिसू शकतात.
  2. डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते.
  3. श्वसनाच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकते.

हेही वाचा :

  1. चीनमध्ये कोरोनानंतर 'या' रहस्यमयी आजाराचा उद्रेक, अनेक शाळा बंद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.