ETV Bharat / bharat

चीन, पाकिस्तानला भरणार धडकी.. भारतीय नौदलात दाखल होणार दोन शक्तिशाली लढाऊ जहाजे..

author img

By

Published : May 17, 2022, 11:07 AM IST

Updated : May 17, 2022, 12:37 PM IST

हिंद महासागरात आणि अरबी समुद्रात आपली ताकद वाढवून भारतीय नौदलाला आव्हान देण्याच्या तयारीत असलेल्या चीन आणि पाकिस्तानसाठी धडकी भरवणारी बातमी आली आहे. भारतीय नौदलात आज संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते दोन शक्तिशाली जहाजांचे जलावतरण होणार आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानचे धाबे दणाणणार आहेत.

INS Surat D69
आयएनएस सुरत डी ६९

मुंबई : चीन आणि पाकिस्तान या भारताच्या दोन शत्रूंकडून नेहमीच सीमेवर आगळीक करण्यात येत असते. भारताला लाभलेल्या विशाल अशा सागरी हद्दीत मात्र भारतीय नौदलाने आपल्या सामर्थ्याद्वारे चीन आणि पाकिस्तानची कोंडी केलेली आहे. त्यामुळे भारताविरोधात ही दोन्ही राष्ट्रे आक्रमक होत आहेत. त्यांच्या याच आगळिकीला उत्तर देण्यासाठी भारताने दोन शक्तिशाली जहाजे भारतीय नौदलात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आज संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते ही जहाजे भारतीय नौदलात समाविष्ठ केली जातील.

समुद्री क्षमता वाढविण्यासाठी आणि भारतीय नौदलासाठी अभिमानाने दोन अत्याधुनिक प्लॅटफॉर्मसचा जलावतरण आज माझगाव डॉक येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होत आहे.आजचा दिवस देशासाठी अतिशय महत्त्वाचा असेल, जेव्हा स्वदेशी बनावटीच्या भारतीय नौदलाच्या सुरत आणि उदयगिरी या दोन युद्धनौका मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे दाखल होतील. यानिमित्त आयोजित दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत.

INS Surat D69
आयएनएस सुरत डी ६९


भारतीय नौदलाची 15B श्रेणीची सुरत युद्धनौका प्रगत श्रेणीची असून, ती मार्गदर्शित क्षेपणास्त्रे नष्ट करण्यास सक्षम आहे. हे मुंबईतील Mazagon Docks Limited येथे तयार करण्यात आले आहे. दुसरी 17A फ्रिगेट्स प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या युद्धनौकेचे नाव उदयगिरी या आंध्र प्रदेशातील रेंजवर ठेवण्यात आले आहे. हे सर्वोत्तम उपकरणे, प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीने सुसज्ज आहे. P17A प्रकल्पांतर्गत एकूण सात जहाजांचे बांधकाम सुरू आहे.


भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आलेल्या या दोन युद्धनौका आज समुद्रात दाखल होणार आहेत. आज प्रथमच मुंबईत विनाशिका आणि एक फ्रिगेट दाखल होणार आहे. ते प्रथमच पाण्यात तरंगतील, जो त्यांच्या बांधणीतील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यानंतर समुद्रातच उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.



फ्रिगेट ( Project 15B Destroyers ) आणि डिस्ट्रॉयर ( Visakhapatnam class destroyers ) या दोन्ही युद्धनौका आहेत. पण, आकार आणि क्षमतेत फरक आहे. विनाशक हे फ्रिगेटपेक्षा दीडपट मोठे आहे. फ्रिगेट एका प्रकारच्या भूमिकेसाठी सर्वात योग्य आहे आणि इतर भूमिकांमध्ये बचावात्मक भूमिकांसाठी वापरला जातो. तर डिस्ट्रॉयरमध्ये अनेक भूमिका निभावण्याची क्षमता असते. हे अँटी पाणबुडी, जहाजविरोधी किंवा विमानविरोधी म्हणून देखील वापरले जाऊ शकते आणि ते अचूकतेने आपली भूमिका बजावते.

हेही वाचा : VIDEO : नौदलाच्या अँटी शिप मिसाईलची कामगिरी; क्षणार्धात लक्ष्याला पोहोचवले समुद्राच्या तळात

Last Updated :May 17, 2022, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.