ETV Bharat / bharat

Top News Today : आजच्या महत्त्वाच्या घडामोडी , वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 19, 2022, 8:02 AM IST

आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या बुलेटीनच्या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )

आज बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप : आज नोव्हेंबरला बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप आहे. बॅंक शाखांबरोबरच एटीएम सेंवावरदेखील (Banking Services)परिणाम होणार आहे. त्यामुळे 19 नोव्हेंबर 2022 रोजी बँक कर्मचारी संपावर ( Bank Employees On Strike)जाणार आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने एक दिवसीय संप पुकारला आहे.

आज भारत जोडो यात्रेत नारी शक्ती सहभागी होणार : भारत जोडो यात्रा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात असून यामध्ये आज काँग्रेसच्या महिला खासदार, आमदार आणि सर्व पदाधिकारी सामील होणार आहेत. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने भारत जोडोमध्ये आज नारी शक्ती दिसून येणार (Nari Shakti in India Jodo Yatra today) आहे.

मराठवाडा विद्यापीठाचा आज 62 वा दिक्षांत समारंभ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 62 वा दिक्षांत समारंभ आहे. या समारंभात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना डी. लिट पदवीनं सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आज दिवसभर असणार (62nd Convocation of Marathwada University) आहे.

‘गॉडफादर’ आज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार : मेगास्टार चिरंजीवी स्टारर ‘गॉडफादर’ आज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. मेगास्टार चिरंजीवीचा चित्रपट रिलीजच्या आधीपासून खूप चर्चेत होता. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी तयार आहे. यात सुपरस्टार नयनतारा, सत्यदेव, मुरली शर्मा, सुनील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात बॉलीवुड स्टार सलमान खानचा देखील एक स्पेशल रोल आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरआज रिलीज होत आहे.

आज जागतिक पुरुष दिन : जागतिक महिला दिनाप्रमाणेच जागतिक पुरुष दिन देखील (Today International Mens Day) सर्व शासकीय कार्यालयात साजरा करण्यात यावा अशी मागणी औरंगाबाद (Aurangabad) येथील पत्नीपीडित पुरुष आश्रमाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 19 नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन असतो परंतु हे पुरुषांना देखील माहीत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.