ETV Bharat / bharat

Big Breaking : श्रीनगरच्या रामबाग परिसरात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

author img

By

Published : Nov 24, 2021, 7:39 AM IST

Updated : Nov 24, 2021, 7:28 PM IST

Big Breaking
Big Breaking

19:22 November 24

श्रीनगरच्या रामबाग परिसरात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू आणि काश्मीर - श्रीनगरच्या रामबाग परिसरात सुरक्षा दल आणि पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

18:55 November 24

महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

एनडीएमएच्या नियमांनुसार कोविड पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये अनुदान देण्याची आवश्यकता

केंद्राकडून प्रत्येक मृतासाठी 3 लाख रुपये देण्यास भाग पाडावे

काँग्रेसची पत्रातून मागणी

18:45 November 24

शिर्डीतील प्रसादालय होणार सुरू

Shirdi Flash News

साईभक्तांना आनंदाची बातमी

शिर्डीतील प्रसादालय होणार सुरू

भक्तांना मिळणार साईबाबांचा लाडू प्रसाद

जिल्हा प्रशासनाने दिली परवानगी

प्रसादालयात भक्तांना आता भोजन करता येणार

साईबाबा संस्थानला मिळाली जिल्हा आरोग्य प्रशासनाची परवानगी

साईमंदिर उघडल्यानंतर बंद होते प्रसादालय

भक्तांना मिळत नव्हता प्रसादलाडू

उद्या किंवा परवापासून सुरू होणार शिर्डीची व्यवस्था

17:30 November 24

नागपूर महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे बाकी आहे त्यांचे वेतन रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

नागपूर महानगरपालिकेने (NMC) ज्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करणे बाकी आहे त्यांचे वेतन रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

बरेच लोक शिल्लक होते पण आता लस घेण्यासाठी येत आहेत: भावना सोनकुसरे, आरोग्य अधिकारी, मनपा

13:29 November 24

एसटी कर्मचारी शिष्टमंडळ आणि राज्य सरकार यांच्यातील पहिली बैठक संपली

  • मुंबई - राज्य सरकारकडून अंतरिम पगारवाढ करण्याचा प्रस्ताव
  • पगारवाढीबरोबरच पगारात सातत्य ठेवण्याची मागणी
  • एस टी संपावर तोडगा काढण्यासाठी मॅरेथॉन बैठका
  • शिष्टमंडळ सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांची हॉल बाहेर चर्चा...
  • दुसऱ्या बैठकीत एसटी कामगार शिष्टमंडळ परिवहन मंत्र्यांसमोर मांडणार आपली भूमिका

13:20 November 24

राज ठाकरे यांच्या नव्या वास्तूमध्ये फडणवीस दाम्पत्य

  • मुंबई - देवेंद्र फडणवीस सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला
  • राज ठाकरे यांच्या नवीन वास्तूत (शिवतीर्थ) झाली भेट
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या नव्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे
  • फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील आहेत

13:13 November 24

कंगना रणौत यांच्या वक्तव्याला मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांचे समर्थन

  • मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत यांच्या वक्तव्याला मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे समर्थन
  • कंगना रणौतने देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याचे वक्तव्य केले होते, त्याचे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी समर्थन केले
  • मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्यात प्रज्ञा सिंह ठाकूर या आरोपी आहेत
  • विशेष न्यायालयातील सुनावणीसाठी त्या मुंबईत आल्या आहेत

12:06 November 24

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला 'इसिस काश्मीर' या संघटनेने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबतची तक्रार गौतम गंभीरने दिल्ली पोलिसात केली आहे.

11:25 November 24

भारतीय चलनी नोटा छापणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटेलिजेंस युनिटचा छापा

मुंबई - मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटेलिजेंस युनिट (CIU) ने पायधोनी भागात भारतीय चलनी नोटा छापण्याऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. एका 47 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कारखान्यातून 1,60,000 रुपयांच्या बनावट नोटा, 2,000 रुपयांच्या 53 बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. 

11:18 November 24

परिवहन मंत्री आणि एसटी कर्मचाऱ्यांची आज पुन्हा बैठक

  • मुंबई - एसटीच्या बैठकीआधी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देवेंद्र फडणीस यांच्या भेटीला
  • शासकीय निवासस्थानी भेट सुरू
  • आज अकरा वाजता परिवहन मंत्री आणि एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा बैठक
  • एसटी संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता

10:57 November 24

खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आज मुंबईतील विशेष NIA ट्रायल कोर्टात हजर होणार

मुंबई - 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आज मुंबईतील विशेष NIA ट्रायल कोर्टात हजर होणार आहेत.

10:53 November 24

शाहुवाडीतील आंबा-तळवडे येथे सशस्त्र दरोडा; दहा लाखांचा मुद्देमाल लंपास

  • कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्यात सशस्त्र दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे.
  • शाहूवाडी तालुक्यातील आंबा-तळवडे येतील शांतय्या शंकराय्या स्वामी यांच्या घरावर हा दरोडा पडला आहे.
  • रात्री उशिरा दरोडा टाकून दरोडेखोरांनी 10 लाख रुपयाचा मुदेमाल चोरून नेला आहे.

08:53 November 24

डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

नाशिक - शहरात हत्यांचे सत्र सुरूच असून म्हसरूळ आरटीओ ऑफिसजवळ तरुणाची हत्या करण्यात आली आहे. डोक्यात दगड घालून ही निर्घृण हत्या झाली आहे. राजू शिंदे अस मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे भाजीपाल्याचे छोटे दुकान आहे. दुकानाच्या वर्चस्ववादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

08:13 November 24

मुंबईत बलात्काराच्या दोन घटना, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार

मुंबई  - मुंबईत बलात्काराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींना शिकार करण्यात आले आहे. दिंडोशीत एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला आहे तर दुसरी घटना मुंबईतील वनराई परिसरात घडली आहे.  

दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले. दिंडोशी परिसरात एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयाने 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

तर मुंबईतील वनराई परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

08:05 November 24

दिंडोशीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २७ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

मुंबई  - येथील दिंडोशी परिसरात एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयाने 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

07:31 November 24

Big Breaking News Live Page - वाचा एका क्लिकवर आतापर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज

मुंबई -  शिवसेना खासदार भावना गवळी चौकशीसाठी ईडी कार्यालयत हजर राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने भावना गवळी यांना समन्स पाठवला होता.

Last Updated : Nov 24, 2021, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.